Video | या जगात सर्वात जास्त नशा कशामध्ये आहे ? मुलीने दिले ‘हे’ उत्तर, व्हिडीओ एकदा पाहाच

लहान मुलीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये ही लहान मुलगी एका प्रश्नाचे मजेदार पद्धतीने उत्तर देत आहे. तिने दिलेल्या उत्तरामुळेच लोकांना हा व्डिडीओ आवडतो आहे.

Video | या जगात सर्वात जास्त नशा कशामध्ये आहे ? मुलीने दिले 'हे' उत्तर, व्हिडीओ एकदा पाहाच
LITTLE GIRL VIRLA VIDEO

मुंबई : सोशल मीडियावर लहान मुलांच्या व्हिडीओंची विशेष चर्चा असते. वेगवेगळ्या समाजमाध्यमांवर लहान मुलांचे व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतात. त्याचे बोबडे बोल, खट्याळपणे केलेल्या करामती यामुळे त्यांचे व्हिडीओ नेटकऱ्यांना आवडतात. सध्या असाच एका लहान मुलीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये ही लहान मुलगी एका प्रश्नाचे मजेदार पद्धतीने उत्तर देत आहे. तिने दिलेल्या उत्तरामुळेच लोकांना हा व्डिडीओ आवडतो आहे. (little girl funny answer on intoxication secret video goes viral on social media)

व्हिडीओमध्ये काय आहे ?

सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये एक लहान मुलगी आहे. ही मुलगी एका स्टूलवर बसलेली आहे. या गोड मुलीच्या हातामध्ये एक मोठं पुस्तक आहे. बसलेली असताना ही छोटीसी मुलगी मजेदार अभिनय करते आहे. सर्वात जास्त नशा कशामध्ये असते असं या मुलीला विचारण्यात येतंय. त्यावेळी उत्तर म्हणून व्हिडीओतील मुलगी ही पुस्तकात सर्वात जास्त नशा असते असे सांगतेय.

मुलीचे प्रश्नाला समर्पक उत्तर

मुलीचे हे उत्तर ऐकूण आपल्याला सुरुवातीला आनंद होतो. एवढ्या लहान मुलीला आतापासूनच पुस्तकाचे वेड असल्याचे पाहून आपल्याला छान वाटते. मात्र, नंतर पुढे ही मुलगी जे सांगते ते अतिशय मजेदार आहे. “पुस्तकाला पाहिलं की लगेच झोप येते. त्यामुळे पुस्तकात सर्वात जास्त नशा असते,” असे ही मुलगी पुढे म्हणताना दिसते. व्हिडीओतील मुलगी स्वत:हून सगळं काही बोलतेय, की फक्त लिप्सिंग करतेय याबाबत दुमत आहे. मात्र, मुलीचा अभिनय हा वाखाणन्याजोगा आहे.

नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया

हा व्हिडीओ नेमका कुठला आहे, याबाबत निश्चित माहिती मिळू शकेलेली नाही. मात्र, त्याला आयपीएस ऑफिसर रुपिन शर्मा (IPS Officer Rupin Sharma) यांनी सोशल मीडिया (Social Media) साईट ट्विटरवर (Twitter) वर शेअर केलं आहे. त्यांनी हा व्हिडीओ शेअर करताच नेटकरी भन्नाट प्रतिक्रिया देत आहेत.

पाहा व्हिडीओ :

रुपीन शर्मा यांनी हा व्हिडीओ 9 जून रोजी आपल्या ट्विटर खात्यावर शेअर केला होता. तेव्हापासून आतापर्यंत हा व्हिडीओ व्हायरल होत असून काही जण मुलीने खरंच सर्वांच्या मनातील उत्तर दिलं आहे, असे काहीजण म्हणतायत.

इतर बातम्या :

Video | दहा फुटाचा साप चढला विजेच्या खांबावर, शॉक लागल्यामुळे घडला मोठा अपघात, व्हिडीओ व्हायरल

Video | पाणी पिण्यासाठी जीव व्याकूळ, तहानलेल्या हत्तीचा संयम एकदा पहाच !

Video | चेहरा झाककेली महिला, एक हात मागे; समोरच्या हतबल तरुणाचं नेमकं काय होणार ?, पाहा संपूर्ण व्हिडीओ

(little girl funny answer on intoxication secret video goes viral on social media)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI