Video | हत्तीच्या पिलाची पाण्यात मस्ती, हत्तीणीची ‘ही’ कृती पाहून नेटकरी खुश, पाहा व्हायरल व्हिडीओ

या व्हिडीओमध्ये एक आई आपल्या मुलाप्रती किती जागरुक असते हे दाखवण्यात आले आहे. हा व्हिडीओ एक हत्तीण आणि तिच्या पिलाचा आहे.

Video | हत्तीच्या पिलाची पाण्यात मस्ती, हत्तीणीची 'ही' कृती पाहून नेटकरी खुश, पाहा व्हायरल व्हिडीओ
VIRAL VIDEO
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: prajwal dhage

Jun 21, 2021 | 4:08 PM

मुंबई : सोशल मीडियावर रोजच हजारो व्हिडीओ व्हायरल होतात. यातील काही व्हिडीओ आपल्याला हसायला लावतात. तर काही व्हिडीओ पाहून आपण आश्चर्यचकित होतो. सध्या व्हायरल होत असलेला व्हिडीओ मात्र काहीसा वेगळा आहे. या व्हिडीओमध्ये एक आई आपल्या मुलाप्रती किती जागरुक असते हे दाखवण्यात आले आहे. हा व्हिडीओ एक हत्तीण आणि तिच्या पिलाचा आहे. (Elephant calf happily bathing in river video went viral on social media)

निरागस पिल्लू बिनधास्त खेळतंय

असं म्हणतात की आईएवढे निस्वार्थ प्रेम या जगात कोणीही करु शकत नाही. कोणतंही संकट आलं तरी आई आपल्या मुलाचे संरक्षण करण्यासाठी तिच्या जिवाची  बाजी लावते. सध्याच्या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्येसुद्धा हेच दिसत आहे. या व्हिडीओमध्ये दोन हत्ती दिसत आहे. यातील एक हत्तीण असावी. तसेच यांच्यासोबत हत्तीचे एक पिल्लूसुद्धा आहे. हे पिल्लू अतिशय निरागस असून ते बिनधास्तपणे खेळत आहे.

पिलाला पाण्यात हुंदडण्याचा मोह

हत्ती, हत्तीण आणि एक पिलू हे एका नदीजवळ थांबले आहेत. तळे पाहून हत्तीच्या पिलाला पाण्यात हुंदडण्याचा मोह झाला आहे. त्यानंतर आपली आई सोबत असल्यामुळे कसलाही विचार न करता हत्तीच्या पिलाने थेट पाण्यात उडी घेतली आहे. नंतर हे पिल्लू पाण्यामध्ये मनसोक्त डुंबत आहे. थंडगार पाण्यामध्ये हत्तीचे पिल्लू खेळत आहे.

पिलाच्या संरक्षणासाठी हत्तीण पाण्यात उतरली

आपले पिल्लू आनंदाने खेळत असल्याचे दिसताच बाजूची हत्तीण मात्र सतर्क झाली आहे. हत्तीण लगेच दुसऱ्या एका हत्तीसोबत पाण्यात उतरली आहे. त्यानंतर जंगली श्वापदं तसेच पाण्यातील मगरी किंवा अन्य हिंस्र प्राण्यांपासून संरक्षण व्हावं म्हणून हत्तीण पाण्यात उतरली आहे. पाण्यात उतरल्यानंतर ही हत्तीण आपल्या पिलांचे संरक्षण करते आहे. हत्तीचं पिल्लू एकीकडे पाण्यात मस्तपैकी हुंदडत आहे. तर हत्तीण त्याचे संरक्षण करतेय.

पाहा व्हिडीओ :

आयएफएस ऑफिसरने शेअर केला व्हिडीओ 

हा व्हिडीओ आयएफएस ऑफिसर सुधा रमन यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केला आहे. त्यांनी सोबतच अतिशय समर्पक कॅप्शन दिले आहे. “जोपर्यंत आपले मुल सुरक्षित आहे, असे वाटत नाही; तोपर्यंत ती त्याला एकटं सोडत नाही,” असं त्यांनी कॅप्शनमध्ये लिहलं आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकरी चांगलेच खुश झाले आहे. ते हा व्हिडीओ आपल्या ट्विटर अकाऊंटवर शेअर करत असून मजेदार कमेंट्सुद्धा करत आहेत.

इतर बातम्या :

Viral Video : पाणीपुरी खाताना नवरदेवासमोर नववधूचा भलताच स्वॅग, व्हिडीओ पाहून हसता पुरेवाट होईल

Video | आधी नवऱ्याला प्रेमाने ओवाळलं, नंतर दिलं ‘हे’ गिफ्ट, खळखळून हसवणारा हा व्हिडीओ पाहाच

(Elephant calf happily bathing in river video went viral on social media)

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें