Video | आधी नवऱ्याला प्रेमाने ओवाळलं, नंतर दिलं ‘हे’ गिफ्ट, खळखळून हसवणारा हा व्हिडीओ पाहाच

या व्हिडीओमध्ये एका महिलेने आपल्या पतीला फादर्स डेच्या निमित्ताने खास गिफ्ट दिले आहे. ही भेट पाहून नेटकऱ्यांना चांगलेच हसू फुटले आहे.

Video | आधी नवऱ्याला प्रेमाने ओवाळलं, नंतर दिलं 'हे' गिफ्ट, खळखळून हसवणारा हा व्हिडीओ पाहाच
fathers day viral video

मुंबई : सोशल मीडियावर रोजच हजारो व्हिडीओ अपलोड केले जातात. यातील काही व्हिडीओ हे चांगलेच मजेदार असल्यामुळे ते काही क्षणांत व्हायरल होतात. सध्या फादर्स डेच्या निमित्ताने एक व्हिडीओ चर्चेचा विषय ठरला आहे. या व्हिडीओमध्ये एका महिलेने आपल्या पतीला फादर्स डेच्या निमित्ताने खास गिफ्ट दिले आहे. ही भेट पाहून नेटकऱ्यांना चांगलेच हसू फुटले आहे. (wife giving broom as special gift to his husband on fathers day funny video went viral on social media)

व्हिडीओ पाहून हसू फुटेल

फादर्स डे असल्यामुळे आज जगभरात पित्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली जाते. लोक आपल्या विडिलांना विविध भेटवस्तू देतात. तर काही लोक आपल्या पित्याचे मनातून आभार मानतात. मात्र, या व्हिडीओमध्ये एका माणसासोबत जे झाले आहे, ते पाहून सर्वांनाच हसू फुटेल. सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये एका पत्नीने फादर्स डेच्या निमित्ताने आपल्या पतीला भेट म्हणून चक्क झाडू दिला आहे. ऐरव्ही फादर्स डेच्या निमित्ताने मुलं वडिलांना भेटवस्तू देतात. मात्र, या व्हिडीओमध्ये महिलेने आपल्या पतीला भेटवस्तू दिली आहे, कदाचित याच कारणामुळे या व्हिडीओची सध्या चर्चा होत आहे.

औक्षण करुन हातात थेट झाडू दिला

ही महिला सुरुवातीला आपल्या पतीचे औक्षण करत आहे. नंतर काही सेकंदानंतर ही महिला आपल्या पतीसाठी भेटवस्तू आणायला गेली आहे. येताना या महिलेने तिच्यासोबत एक झाडू आणलेला दिसतोय. ओवाळल्यानंतर या महिलेने आपल्या नवऱ्याच्या हातात थेट झाडू दिला आहे. नंतर व्हिडीओतील माणसाने त्याच झाडूला अत्यंत श्रद्धेने प्रणाम केला आहे. प्रणाम करुन व्हिडीओतील माणूस घरात झाडू मारत आहे.

पाहा व्हिडीओ :

व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

दरम्यान, फादर्स डे च्या दिवशी मुलं आपल्या वडिलांना भेटवस्तू देतात. मात्र, या व्हिडीओमध्ये पत्नीने आपल्या पतीला दिलेल्या खास गिफ्टमुळे सोशळ मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. आयपीएस रुपीन शर्मा यांनी या व्हिडीओला आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर केले आहे. हा व्हिडीओ लोक मोठ्या प्रमाणात लाईक करत आहेत.

इतर बातम्या :

Video | आधी मनसोक्त खेळले नंतर उतरताना झाले स्पायडर मॅन, दोन माकडांची ‘ही’ टेक्निक एकदा पाहाच

Video | बाण मारला अन् थेट अंगठीत घुसला, धडाकेबाज तिरंदाजाची दमदार कामगिरी, व्हिडीओ पाहाच

Video | नवरदेव लग्न विधीमध्ये गुंतला, नवरीचा पाणीपुरीवर ताव, हटके व्हिडीओ एकदा पाहाच

(wife giving broom as special gift to his husband on fathers day funny video went viral on social media)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI