प्रयत्नांती परमेश्वर! 650 वेळा सराव, सर्वात लहान हेलिपॅडवर विमानाचं लँडिंग! व्हिडीओ व्हायरल

हे हेलिपॅड जगातील सर्वात लहान कमर्शियल हेलिपॅड आहे. कमी रुंदीच्या एवढ्या उंचीवर बांधलेले हे हेलिपॅड विमानाच्या लँडिंगसाठी अत्यंत धोकादायक मानले जाते आणि थोडीशी चूकही वैमानिकाचा जीव घेऊ शकते.

प्रयत्नांती परमेश्वर! 650 वेळा सराव, सर्वात लहान हेलिपॅडवर विमानाचं लँडिंग! व्हिडीओ व्हायरल
helicopter landing
Image Credit source: Social Media
| Updated on: Mar 18, 2023 | 11:56 AM

विमाने उडवणारे वैमानिक इतके प्रशिक्षित असतात की ते प्रत्येक परिस्थितीत काहीतरी पर्याय शोधण्यात तज्ञ असतात. त्याच्या या कौशल्याचे अनेक व्हिडिओ समोर येत असतात. नुकताच असाच एक व्हिडिओ समोर आला आहे ज्यामध्ये एक पायलट 56 मजली घराच्या छतावर मिनी विमान उतरवतो की पाहणारे अवाक होतात. हा व्हिडिओ दुबईतील एका हॉटेलच्या वरचा आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, पायलटचे नाव एअर रेसिंग चॅम्पियन ल्यूक सेपेला आहे. दुबईतील बुर्ज अल अरब हॉटेलच्या छतावर त्याने केलाय. या हॉटेलच्या छतावर अवघ्या 27 मीटरचे हेलिपॅड आहे. पण त्यावर सहजपणे मिनी विमान उतरवले जाते. 27 मीटर रुंदीच्या हेलिपॅडवर आपले विमान उतरवणारे ते पहिले व्यक्ती ठरले आहेत. हे करतानाचा व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल होतोय.

आणखी एका रिपोर्टनुसार, हे हेलिपॅड जगातील सर्वात लहान कमर्शियल हेलिपॅड आहे. कमी रुंदीच्या एवढ्या उंचीवर बांधलेले हे हेलिपॅड विमानाच्या लँडिंगसाठी अत्यंत धोकादायक मानले जाते आणि थोडीशी चूकही वैमानिकाचा जीव घेऊ शकते. मात्र ल्यूक गेल्या दोन वर्षांपासून या धोकादायक स्टंटची तयारी करत होते. या लँडिंगपूर्वी त्याने 650 वेळा सराव केलाय, असे असूनही तिसऱ्या प्रयत्नात त्याला अंतिम लँडिंग करण्यात यश आले आहे.

या लँडिंगसाठी मला एअर ट्रॅफिक कंट्रोल सिग्नल किंवा इतर कोणतीही सुविधा मिळालेली नाही, असे त्यांनी नंतर सांगितले. मी माझ्या क्षमतेचा पुरेपूर वापर करून योग्य ठिकाणी विमान उतरवले. मात्र, त्यानंतर उड्डाण करणे अधिकच रोमांचक होते. जगात पहिल्यांदाच हॉटेलच्यावर बांधलेल्या हेलिपॅडवर विमान उतरवण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे सांगण्यात आले. ते ही तितकं सोपं नव्हतं. सध्या त्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.