6 पत्नींसाठी पतीने तयार केला 20 फुटी पलंग, खर्च केले इतके लाख, पुन्हा व्हायरल झाला व्यक्ती

Brazil Husband-Wife: ब्राझील देशातून एक हटके बातमी समोर आली आहे. इथं एका पतीने त्याच्या सहा पत्नीसाठी 20 फुटी पलंग तयार केला आहे. त्याविषयीची माहिती त्याने समाज माध्यमावर शेअर केली आहे. या पलंगासाठी त्याला इतका लाख खर्च करावा लागला.

6 पत्नींसाठी पतीने तयार केला 20 फुटी पलंग, खर्च केले इतके लाख, पुन्हा व्हायरल झाला व्यक्ती
6 पत्नींसाठी पतीने तयार केला 20 फुटी पलंग
Image Credit source: गुगल
| Updated on: Feb 12, 2026 | 4:45 PM

Brazil Husband-Wife: ब्राझील देशातील साओ पाऊलोमध्ये राहणाऱ्या सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आर्थर ओ उर्सो हा नेहमी त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असतो. खासगी आयुष्यातील क्षण तो सातत्याने शेअर करतो. कधी त्याचा फिटनेसविषयी तर कधी त्याच्या बहुपत्नी विवाहामुळे तो कायम चर्चेत आहे. कधी काळी हा पठ्ठ्या त्याच्या 9 पत्नींसह एका आलिशान घरात राहत होता. पण काही दिवसांपूर्वी त्याच्या चार पत्नी त्याला सोडून गेल्या. त्याने नंतर पुन्हा एक लग्न केले. सध्या त्याच्या 6 बायका आहेत. सहा पत्नींसह तो या आलिशान घरात राहतो.

सर्वांसाठी एकच पलंग

आपल्या सर्व पत्नींना झोपण्यासाठी त्याने एकच पलंग तयार करण्याचा चंग बांधला. या विशाल पलंगाची आयडिया खूपच लोकप्रिय झाली. त्याच्या पत्नींना पण ही कल्पना आवडली. त्याने सुपर बेड तयार केला. त्यासाठी त्याला जवळपास 80 लाख रुपये खर्च आला. हा पलंग तयार करण्यासाठी कारागिरांना 15 महिने लागले. हा खास बेड तयार करण्यासाठी, पलंग तयार करण्यासाठी 12 कारागीर रात्रंदिवस झटत होते. हा पलंग मजबूत आणि टिकाऊ होण्यासाठी जवळपास 950 खिळ्यांचा वापर करण्यात आला. या पलंगावर आता दहा लोक झोपले तरी त्याला अजिबात धोका नाही.

पलंगाने व्यापला मोठा भाग

आर्थरने या पलंगाचे फोटो साईटवर शेअर केले आहे. हा पलंग सामान्य बेडपेक्षा कित्येक पट अधिक आहे. या पलंगाची लांबी जवळपास 20 फूट आणि रूंदी जवळपास 7 फूट आहे. या पलंगाने एक मोठी खोली व्यापली आहे. अगोदरचा पलंग छोटा असल्याने 9 जणांना झोपणे अवघड होते. पण आता हा नवीन पलंग केल्यापासून सर्व जणांना आरामशीर झोपता येत असल्याचे त्याने पोस्टमध्ये म्हटले आहे. सर्व पत्नी या बेडवर गप्पा मारत झोपत असल्याचे त्याने सांगितले. त्यामुळे सर्वांचं बॉडिंग चांगलं झालं आहे. नाते घट्ट झाल्याचा आर्थरचा दावा आहे.

कोण आहे आर्थर ओ उर्सो?

आर्थर ओ उर्सो हा ब्राझीलचा सर्वाधिक चर्चेत असलेला इन्फुलएन्सर आहे. त्याची जीवनशैली एकदम हटके आहे. त्यावरून त्याच्यावर टीका पण होते.लुआना काजाकी, एमेली सूजा, वाल्किरिया सैंटोस, ओलिंडा मारिया, डामियाना आणि अमांडा अल्बुकर्क या सहा त्याच्या पत्नी आहेत. त्यांच्यासोबत तो आलिशान बंगल्यात राहतो. पण त्याच्यावर अश्लाघ्य टीका करण्यात येते. तरीही तो सोशल मीडियावर सक्रिय असतो आणि त्याला अनेक जण फॉलो पण करतो.

Follow Us