भगवान की दया से सबकुछ है, आता फक्त 1 हेलिकॉप्टर विकत घ्यायचं आहे… डिजीटल भिकाऱ्याचा व्हिडीओ तुफान व्हायरल!

मध्य प्रदेशमधील सागर जिल्ह्यातील एका भिकाऱ्याचा व्हिडीओ भलताच व्हायरल झाला आहे. झुनझुन बाबा असे त्यांचे नाव असून त्यांनी पेटीएमद्वारे भीक मागून लाखो रुपये कमावले आहेत. आता एक हेलिकॉप्टर विकत घ्यायची इच्छा आहे.

भगवान की दया से सबकुछ है, आता फक्त 1 हेलिकॉप्टर विकत घ्यायचं आहे... डिजीटल भिकाऱ्याचा व्हिडीओ तुफान व्हायरल!
भगवान की दया से सबकुछ है, आता फक्त 1 हेलिकॉप्टर विकत घ्यायचं आहे... डिजीटल भिकाऱ्याचा व्हिडीओ तुफान व्हायरल!
Image Credit source: tv9marathi
| Updated on: Aug 10, 2022 | 3:01 PM

Digital Beggar Video: सध्याचा जमाना डिजीटलचा आहे. सामान्यत: आजकाल सर्व लोकांचे सगळे पैशांचे व्यवहार ऑनलाइन होताना दिसतात. दूध विकत घेण्यापासून ते दुकानात कपडे घेण्यापर्यंत सर्वजण ऑनलाइन पेमेंटवर भर देताना दिसतात. मध्य प्रदेशमधील (Madhya Pradesh) अशाच एका डिजीटल भिकाऱ्याचा (Digital beggar) व्हिडीओ सध्या तूफान व्हायरल झाला आहे. वाचून आश्चर्य वाटलं ना! भिकारी कसा डिजीटल असेल, असा प्रश्नही पडला असेल ना ? मग पुढील बातमी नक्की वाचा.. हा भिकारी फक्त डिजीटलच नाही, तर त्याच्याकडे लाखो रुपयांची संपत्ती असून त्यातून त्याने बरीच प्रॉपर्टीही विकत घेतली आहे. आणि आता त्याला एक हेलिकॉप्टर विकत घ्यायची इच्छा (beggar wants to buy helicopter)आहे. जाणून घेऊया नक्की काय प्रकार आहे हा…


मध्य प्रदेशमधील सागर जिल्ह्यातील सुरखी येथील झुनझुन बाबा यांची ही कहाणी आहे. झुनझुन बाबा यांच्या ट्विटरवरील व्हिडीओची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. तो तूफान व्हायरल झाला आहे. 80 वर्षांचा हे झुनझुन बाबा टेक्नोफ्रेंडली आहेत. ते पेटीएमद्वारे भीक मागतात. ज्या लोकांकडे सुट्टे पैसे नसतात, त्यांना ते पेटीएमचा नंबर दाखवून त्यात पैसे ट्रान्सफर करण्यास सांगतात. झुनझुन बाबा यांच्या हातातील एका स्टीलच्या भांड्यावर मोबाईल नंबर लिहीलेला असून तो नंबर त्यांच्या मुलाचा आहे. त्यांच्या मुलाच्या फोनमध्ये पेटीएम आहे. त्याच्याकडे हे पैसे जातात आणि गरज असते तेव्हा झुनझुन बाबा त्याच्याकडून त्यांना हवे तेवढे पैसे मागून घेतात.

एवढेच नव्हे तर या टेक्नोसॅव्ही बाबाने आत्तापर्यंत भीक मागून लाखो रुपयांची संपत्तीही जमा केली आहे. मध्य प्रदेशमधील काही मोठ्या शहरांमध्ये त्यांनी काही घरं, जमीनही विकत घेतली आहे. हा व्हिडीओ शूट करणाऱ्या इसमाकडेही त्याने पैसे मागितले आणि जेव्हा त्या व्यक्तीने पैसे नसल्याचे सांगितले. तेव्हा झुनझुन बाबाने हातातील स्टीलच्या कॅनवरील नंबर दाखवून पेटीएमद्वारे त्या नंबरवर पैसे पाठवण्यास सांगितले. भीक मागून एवढे पैसे जमवल्याबद्दल त्यांना प्रश्न विचारण्यात आला असता, त्यात गैर काय असाच सवाल झुनझुन बाबाने विचारला.

हेलिकॉप्टर विकत घ्यायची आहे इच्छा

झुनझुन बाबाचा व्हिडीओ ट्विटरवर व्हायरल झाला आहे. त्यात एक इसम त्यांच्याशी बोलताना दिसत आहे. झुनझुन बाबाने आत्तापर्यंत लाखो रुपये भीक मागून जमवले आहेत. इंदौर आणि काही अन्य शहरांत त्यांचे स्वत:चे घर आहे. आता त्यांना एक हेलिकॉप्टर विकत घ्यायची इच्छा आहे. पुरेसे पैसे जमा झाले की हे स्वप्न नक्की पूर्ण करणार असे त्यांनी नमूद केले.