Wardha Rain Update : वर्धा जिल्ह्यात पूर ओसरायला सुरुवात, रस्त्यावर पाणी असल्याने वाहतूक अद्यापही बंद

भारतीय हवामान खात्याने महाराष्ट्रात या आठवड्यातही मुसळधार पाऊस सुरू राहील. 14 ऑगस्टपर्यंत पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवला आहे.

Wardha Rain Update :  वर्धा जिल्ह्यात पूर ओसरायला सुरुवात, रस्त्यावर पाणी असल्याने वाहतूक अद्यापही बंद
वर्धा जिल्ह्यात पूर ओसरायला सुरुवात, रस्त्यावर पाणी असल्याने वाहतूक अद्यापही बंद Image Credit source: tv9marathi
Follow us
| Updated on: Aug 10, 2022 | 2:05 PM

वर्धावर्धा (Wardha) जिल्ह्यात सततच्या पावसामुळे नदी, नाले पुन्हा ओसंडुन वाहू लागली आहेत. हिंगणघाट (Hinganghat) तालुक्यातील कान्होली (Kanholi) गावाला सुद्धा मंगळवारी जोरदार पाऊस झाल्याने पुराने विळखा घातला होता. दरम्यान प्रशासनाने आगोदरचं खबरदारी म्हणून 15 कुटुंबातील 51 नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित केले होते. आज सकाळपासून गावातील पाणी ओसरले असल्याची माहिती तहसीलदार सतीश मासाळ यांनी दिली. उर्वरित सर्व नागरिक सुरक्षित असून गावात जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर पाणी असल्याने अद्यापही गावात जाणारी वाहतूक बंद आहे अशी माहिती मिळाली आहे.

कान्होली या गावाला एका महिन्यात दुसऱ्यांदा पुराचा फटका

कान्होली या गावाला एका महिन्यात दुसऱ्यांदा पुराचा फटका बसला आहे. या गावाचे दोन टप्प्यात पुनर्वसन झाले असून उर्वरित नागरिकांचे तातडीने पुनर्वसन करण्याची मागणी होत आहे. सतत सुरु असलेल्या पावसामुळे हजारो हेक्टरवरील शेती पाण्याखाली गेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. प्रशासनाकडून पंचनामे करण्यात येत आहेत. पण अद्याप मदत मिळाली नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त आहे. दुसऱ्यादा पूर आल्याने नागरिक हवालदील झाले आहेत. तसेच हवामान खात्याने महाराष्ट्रात पुन्हा रेड अलर्ट जारी केला असल्याने महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता आहे.

हे सुद्धा वाचा

14 ऑगस्टपर्यंत पावसाची शक्यता

भारतीय हवामान खात्याने महाराष्ट्रात या आठवड्यातही मुसळधार पाऊस सुरू राहील. 14 ऑगस्टपर्यंत पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवला आहे. या दरम्यान राज्याच्या विविध जिल्ह्यात हलका ते मुसळधार पाऊस मुसळधार पाऊस सुरु झाला आहे. पावसाचा सर्वाधिक परिणाम कोकणात झाला असून मुसळधार पाऊस सुरु आहे. रायगड, रत्नागिरी, सांगली, पुणे आणि सातारा मुसळधार पाऊस सुरु आहे. राज्यातली अनेक धरणं भरली असून नद्यांना पूर आला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील अनेक रस्ते बंद आहेत. तसेच ज्या भागात अतिवृष्टी झाली आहे. त्या भागात जिल्हा प्रशानाने घरातून बाहेर न पडण्याच्या सुचना जारी केल्या आहेत. जी लोक पुराच्या पाण्यात अडकली आहे, त्यांना बाहेर काढण्याचं काम सुरु आहे.

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.