पगार कमी आहे म्हणून, महिला कर्मचाऱ्याने असे काही केले की…नंतर बॉसने केले हे काम !

जर तुम्हाला कमी पगार दिला जात असेल तर तुम्ही काय करता, बॉसला पगार वाढवण्याची मागणी करता. किंवा अधिक चांगले काम करुन दाखवता. मात्र एका महिला कर्मचाऱ्याने तिला मिळत असलेल्या पगाराच्या बद्दल आवाज उठवण्याची स्वीकारलेला मार्ग धक्कादायक ठरला आहे.

पगार कमी आहे म्हणून, महिला कर्मचाऱ्याने असे काही केले की...नंतर बॉसने केले हे काम !
file photo
| Updated on: Apr 14, 2026 | 8:55 PM

कर्मचारी त्याला कंपनीकडून कमी पगार दिला जात असेल तर आपली नोकरी बदलतात, किंवा तक्रार करतात वा शांत राहून आपले काम करण्याचा निर्णय घेतात. परंतू चीनमध्ये एक अनोखा प्रकार घडला आहे. या घटनेने सोशल मीडियावर मोठा चर्चा सुरु झाली आहे. लोकांची वेगवेगळे मुद्दे मांडले आहेत. कोणी या महिला कर्मचाऱ्याला पाठींबा दिला आहे तर कोणी विरोध केला आहे.

हे प्रकरण चीनच्या शांगच्यू शहरातील म्हटले जात आहे. येथे एक महिला तिच्या पगारावरुन खूप नाराज होती. तिचे असे म्हणणे होते की तिच्या कामापेक्षा तिला पगार कमी दिला जात आहे. या नाराजीमुळे तिने असा प्रकार केला ज्याने सर्वांनाच धक्का बसला आहे. बातमीनुसार महिलेने ऑफीस वेळेत डेस्कवर काम करण्याच्या ऐवजी पाच तास झोपण्याचा निर्णय घेतला. तसेच तिने असेही म्हटले की जेवढे पैसे मिळतात तेवढेच काम करेन. त्यामुळे ऑफीसात गोंधळ उडाला.

बॉसची प्रतिक्रीय आणि इशारा

जेव्हा कंपनीच्या बॉसने या महिलेला अशा प्रकारे कार्यालयात झोपलेले पाहिले तर ते खूपच नाराज झाले. बॉसने या कर्मचाऱ्याला जाब विचारत पुन्हा असे घडले तर नोकरीवर पाणी सोडायला लागेल असेही सांगितले. त्यानंतर या महिलेने स्वत:ची बाजू मांडण्यासाठी सोशल मीडियाचा आधार घेतला. तिने एक व्हिडीओ पोस्ट केला.त्यात ती रडताना दिसत आहे. तिने या व्हिडीओत फिर्याद मांडली की कंपनी तिच्यासोबत न्याय करत नाही.तसेच तिने हेही स्पष्ट केले की तिचा नोकरी सोडण्याचा कोणताही विचार नाही, तिला केवळ तिची बाजू मांडायची होती असा दावा तिने केला आहे.

प्रकरण वाढले, गंभीर झाला !

हा बॉस आणि कर्मचाऱ्यातील वाद येथे संपला नाही. त्याऐवजी आणखीन वाढला आणि गंभीर झाला. बातमीनुसार जेव्हा महिला झोपेतून उठली, तेव्हा तिने तिच्या बॉसच्या डेस्कवरील चॉकलेट खाल्ले. बॉसला ग्लुकोजसंबंधी समस्या आहे. आणि त्याला वेळोवेळी गोड खावे लागते.चॉकलेट गायब झाल्यानंतर बॉसची तब्येत बिघडली आणि बॉसला आणखीनच राग आला. तिचे वागणे बेजबाबदार आणि अनुचित व्यवहार असल्याचा आरोप तिच्यावर झाला.

सोशल मीडियावर दोन गट पडले –

संपूर्ण प्रकरणात सोशल मीडियावर दोन गट पडले. काही लोकांनी महिलेची बाजू घेत म्हटले की कमी सॅलरीबद्दल आवाज उठवणे तिचा हक्क असल्याचा दावा अनेकांनी केला. तर काही लोकांनी तिचा व्यवहार शिस्तभंग आणि चुकीचा असल्याचे म्हटले. सध्या हा प्रकार चर्चेत आहे. लोक यावर वर्कप्लेस एथिक्स आणि कर्मचाऱ्यांचे अधिकार यावरुन एकमेकांना सल्ले देत आहेत.

Follow Us