AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मातोश्रीवर बैठक, पण उमेदवारी अर्जच गायब; ठाकरे गटात नेमकं काय चाललंय?

मातोश्रीवर बैठक, पण उमेदवारी अर्जच गायब; ठाकरे गटात नेमकं काय चाललंय?

| Updated on: Jun 02, 2026 | 10:56 AM
Share

उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना ठाकरे गटामध्ये नाशिक विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अंतर्गत घडामोडींना वेग आल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. पक्षातील काही स्थानिक नेत्यांच्या भूमिकेमुळे ठाकरे गटात संभ्रमाचे वातावरण निर्माण झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना ठाकरे गटामध्ये नाशिक विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अंतर्गत घडामोडींना वेग आल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. पक्षातील काही स्थानिक नेत्यांच्या भूमिकेमुळे ठाकरे गटात संभ्रमाचे वातावरण निर्माण झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, नाशिकचे नेते अनिल कदम यांनी मातोश्रीवर वरिष्ठ नेत्यांसोबत चर्चा केल्यानंतरही उमेदवारी अर्ज दाखल केला नाही. तसेच वसंत गीते यांनी अर्ज घेतला असला तरी त्यांनीही उमेदवारी अर्ज भरला नसल्याचे समोर आले आहे. या घडामोडींमुळे नाशिकमधील ठाकरे गटाच्या राजकीय रणनीतीबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

दरम्यान, या विषयावर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्थानिक पातळीवरील पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली असून पुढील निर्णय नगरसेवक आणि स्थानिक नेतृत्वाच्या मतानुसार घेतला जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

या सर्व घडामोडींमुळे नाशिकमधील ठाकरे गटाच्या राजकारणात नेमके काय घडते आणि पक्षाची पुढील भूमिका काय असणार, याकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Published on: Jun 02, 2026 10:56 AM

Follow Us
मोठी बातमी! सोनम वांगचूक यांना रुग्णालयात केलं दाखल; दिल्लीच्या जंतरमंतरवर मोठा गोंधळ.

मोठी बातमी! सोनम वांगचूक यांना रुग्णालयात केलं दाखल; दिल्लीच्या जंतरमंतरवर मोठा गोंधळ

Abhijeet Dipke : दिल्ली पोलिसांकडून मला मारहाण, अभिजीत दीपके यांचा गंभीर आरोप.

Abhijeet Dipke : दिल्ली पोलिसांकडून मला मारहाण, अभिजीत दीपके यांचा गंभीर आरोप

Maharashtra Weather Updates : मेघगर्जनेसह कोसळणार जोरदार पाऊस, आज ‘या’ जिल्ह्यांना यलो अलर्ट;  IMD चा मोठा इशारा.

Maharashtra Weather Updates : मेघगर्जनेसह कोसळणार जोरदार पाऊस, आज ‘या’ जिल्ह्यांना यलो अलर्ट; IMD चा मोठा इशारा

केंद्रीय मंत्रिमंडळात मोठा फेरबदल होणार; शिंदेंच्या वाट्याला किती मंत्रिपदे येणार? महत्वाची अपडेट समोर.

केंद्रीय मंत्रिमंडळात मोठा फेरबदल होणार; शिंदेंच्या वाट्याला किती मंत्रिपदे येणार? महत्वाची अपडेट समोर

हॉटेलच्या लिफ्टमध्ये अडकले शशी थरूर, मग झाले काय? 15 मिनिटांनी असे काढले बाहेर.

हॉटेलच्या लिफ्टमध्ये अडकले शशी थरूर, मग झाले काय? 15 मिनिटांनी असे काढले बाहेर

Mumbai Railway Megablock : लोकल प्रवाशांसाठी मोठी अपडेट! रविवारी मेगाब्लॉक, घराबाहेर पडण्याआधी वाचा.

Mumbai Railway Megablock : लोकल प्रवाशांसाठी मोठी अपडेट! रविवारी मेगाब्लॉक, घराबाहेर पडण्याआधी वाचा