AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mumbai Railway Megablock : लोकल प्रवाशांसाठी मोठी अपडेट! रविवारी मेगाब्लॉक, घराबाहेर पडण्याआधी वाचा

येत्या रविवारी मध्य रेल्वेवर मेगाब्लॉक असल्याने मुंबईकरांनी प्रवासाचे नियोजन करावे. विद्याविहार ते ठाणे आणि ठाणे ते वाशी/नेरुळ मार्गांवर हा ब्लॉक घेण्यात येणार आहे. यामुळे मुख्य मार्गावरील जलद लोकल विलंबाने धावतील, तर ट्रान्स हार्बर मार्गावरील सेवा रद्द असतील. प्रवाशांनी पर्यायी व्यवस्थेचा वापर करावा किंवा प्रवासापूर्वी अद्ययावत माहिती तपासावी.

Mumbai Railway Megablock : लोकल प्रवाशांसाठी मोठी अपडेट! रविवारी मेगाब्लॉक, घराबाहेर पडण्याआधी वाचा
मध्य रेल्वेवर उद्या मेगाब्लॉक, जाणून घ्या वेळा
| Updated on: Jul 18, 2026 | 8:05 AM
Share

वर्षाचे 365 दिवस अविरत धावणाऱ्या, लाखो मुंबईकरांना इच्छित स्थळी सुखरुपपणे पोहोचवणारी मुंबईकांची लाईफलाइन, अर्थात रेल्वे. मुंबईतील मध्य रेल्वेच्या प्रवाशांसाठी एक मोठी अपडेट समोर आली आहे. येत्या रविवारी लोकलने प्रवास करणाऱ्या मुंबईकरांसाठी ही अत्यंत महत्वाची बातमी आहे. मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात विविध अभियांत्रिकी आणि देखभाल कामांसाठी उद्या मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे मुख्य मार्गावरील जलद लोकल आणि ट्रान्स हार्बर मार्गावरील अनेक लोकल फेऱ्या रद्द राहणार असून काही गाड्या उशिराने धावण्याची शक्यता आहे. म्हणूनच रविवारी बाहेर पडण्याच्या विचारात असलेल्या प्रवाशांनी प्रवासाचे नियोजन करूनच घराबाहेर पडावे, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.

कुठे असणार मेगाब्लॉक ?

मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावरील विद्याविहार ते ठाणे स्थानकांदरम्यान पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेवर सकाळी ८.०० ते दुपारी १.३० या वेळेत मेगा ब्लॉक राहणार आहे. या कालावधीत या मार्गिकेवरील अप आणि डाऊन दिशेच्या सर्व रेल्वेगाड्या जलद मार्गावरून वळविण्यात येतील. परिणामी जलद मार्गावर अतिरिक्त रेल्वे वाहतूक होणार असल्याने तेथील लोकल सेवा काही प्रमाणात विस्कळीत होण्याची शक्यता असून अनेक गाड्या विलंबाने धावू शकतात.

याशिवाय, ट्रान्स हार्बर मार्गावरही ठाणे ते वाशी/नेरूळ स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन मार्गावर सकाळी ११.१० ते दुपारी ४.१० या वेळेत मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. या काळात वाशी–नेरूळ–ठाणे दरम्यानच्या दोन्ही दिशेतील लोकल सेवा पूर्णपणे रद्द राहतील.

या ब्लॉकमुळे ठाणे स्थानकावरून वाशी, नेरूळ आणि पनवेलच्या दिशेने सकाळी १०.३५ ते दुपारी ४.०७ या वेळेत सुटणाऱ्या सर्व डाऊन लोकल सेवा रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच पनवेल, नेरूळ आणि वाशी येथून ठाण्याच्या दिशेने सकाळी १०.२५ ते दुपारी ४.०९ या वेळेत सुटणाऱ्या सर्व अप लोकल सेवाही रद्द राहतील.

रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना पर्यायी वाहतुकीचा वापर करण्याचा किंवा प्रवासाचे वेळापत्रक ब्लॉकनुसार आखण्याचा सल्ला दिला आहे. ब्लॉकदरम्यान रेल्वे सेवा टप्प्याटप्प्याने सुरू राहणार असली, तरी काही गाड्यांना विलंब होण्याची शक्यता असल्याने प्रवाशांनी रेल्वेच्या अद्ययावत सूचनांकडे लक्ष ठेवावे.

Follow Us
3700 कोटींचे टेंडर्स, अन्...; अजय बारस्करांचे मनोज जरांगेंच्या...
Ajay Baraskar : 3700 कोटींचे टेंडर्स, कोट्यवधींच्या जमिनी; अजय बारस्करांचे मनोज जरांगेंच्या निकटवर्तीयांवर गंभीर आरोप
कधी एकमेकांचे कट्टर विरोधक, रवी राणा आणि बच्चू कडू एकत्र
Amravati : कधी एकमेकांचे कट्टर विरोधक, आता एकाच ध्येयासाठी एकत्र; रवी राणा-बच्चू कडूंच्या भेटीची चर्चा
जंतरमंतरवर पोलीस न लावता आंदोलन करू द्या, आहे का हिंमत?
Sandip Deshpande : जंतरमंतरवर पोलीस न लावता आंदोलन करू द्या, आहे का हिंमत? संदीप देशपांडेंचं थेट आव्हान
मी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा वाघ... अजय बारस्करांचा जरांगेंना इशारा
Ajay Baraskar on Manoj Jarnage : मी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा वाघ, तु...; अजय बारस्करांचा मनोज जरांगेंना थेट इशारा
शिवसेनेचं शिष्टमंडळ फडणवीसांना भेटणार, चर्चेचा विषय काय?
Shivsena : महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी घडामोड; शिवसेनेचं शिष्टमंडळ फडणवीसांना भेटणार, चर्चेचा विषय काय?
एवढं मोठं प्रकरण झालं, लाड भाऊ गेले कुठे? मनोज जरांगेंचा सवाल
Manoj Jarange Patil on Prasad Lad : एवढं मोठं प्रकरण झालं, लाड भाऊ गेले कुठे? मनोज जरांगेंचा सवाल
मनोज जरांगेंनी केली रामदास कदमांची नक्कल, म्हणाले...
Manoj Jarange on Ramdas Kadam : मनोज जरांगेंनी केली रामदास कदमांची नक्कल, म्हणाले...
मनोज जरांगेंची ऑडिओ क्लिप खरी की AI जनरेटेड? भाजपची SIT चौकशीची मागणी
Navnath Ban On Jarange Viral Audio Clip : मनोज जरांगेंची ऑडिओ क्लिप खरी की AI जनरेटेड? भाजपची SIT चौकशीची मागणी
ऑडिओ क्लिपची चौकशी करा, नाहीतर...; जरांगे पाटलांचं फडणवीसांना आव्हान
Jarange Patil On Viral Audio Clip : ऑडिओ क्लिपची चौकशी करा, नाहीतर...; मनोज जरांगे पाटलांचं देवेंद्र फडणवीसांना थेट आव्हान
जरांगे पाटलांच्या ऑडिओ क्लिपमध्ये संजय राऊत अन् सुषमा अंधारेंची नावं?
Manoj Jarange Viral Audio Clip : जरांगे पाटलांच्या ऑडिओ क्लिपमध्ये संजय राऊत अन् सुषमा अंधारेंची नावं? महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ