ना दुकानात दुकानदार, ना घराला कुलूप, ‘या’ गावात कधीच होत नाही चोरी, सौंदर्य असं की पाहून प्रेमात पडाल

असं एक गाव जिथे ना कोणत्या घराला कुलूप, ना कोणत्या दुकानात दुकानदार, तरी देखील या गावात कधीच होत नाही चोरी. सौंदर्याने नटलेलं हे गाव कुठे आहे. जाणून घ्या.

| Updated on: Jan 22, 2026 | 4:19 PM
1 / 6
एकीकडे देशातील मोठ्या शहरांमध्ये चोरी, अविश्वास, असुरक्षितता आणि तणाव हे रोजचं वास्तव बनलं आहे तर दुसरीकडे नागालँडमधील एक छोटंसं गाव अशी आदर्श जीवनशैलीमध्ये जगत आहे जी ऐकून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.

2 / 6
 हे गाव ना नाईटलाइफसाठी ओळखलं जातं, ना गोंगाटासाठी किंवा गर्दीसाठी. उलट, आपसी विश्वास, प्रामाणिकपणा, पर्यावरणपूरक जीवन आणि सामाजिक जबाबदारी यासाठी हे गाव संपूर्ण देशात चर्चेत आहे. या गावाचं नाव आहे खोनोमा.

3 / 6
खोनोमा हे नागालँडची राजधानी कोहिमा जवळ वसलेलं हिरव्या डोंगररांगांनी आणि निसर्गसौंदर्याने नटलेलं गाव आहे. स्वच्छ हवा, शांत वातावरण आणि शिस्तबद्ध जीवनशैली हे या गावाचं वैशिष्ट्य आहे.

4 / 6
सुमारे 20 चौरस किलोमीटर क्षेत्रफळात पसरलेल्या या गावात अंगामी नागा ही आदिवासी जमात राहते. 2011 च्या जनगणनेनुसार, येथे सुमारे 1,900 लोकसंख्या आणि 424 घरे आहेत. एकेकाळी शिकारीवर अवलंबून असलेलं हे गाव, 1998 मध्ये शिकारीवर बंदी घातल्यानंतर पूर्णपणे बदललं आणि पर्यावरणसंवर्धनाच्या दिशेने वाटचाल करू लागलं.

5 / 6
खोनोमाची सर्वात आश्चर्यकारक बाब म्हणजे येथील दुकाने दुकानदारांशिवाय चालतात. गावात अनेक अशी छोटी दुकाने आहेत, जिथे कोणीही बसलेलं नसतं. प्रत्येक वस्तूवर तिची किंमत लिहिलेली असते. कोणालाही काही घ्यायचं असल्यास ते सामान उचलतात आणि त्याचे पैसे तिथेच ठेवून पुढे जातात.

6 / 6
येथील लोकांचा एकमेकांवर इतका विश्वास आहे की चोरीचा प्रश्नच उद्भवत नाही. इतकंच नाही तर अनेक घरांना कुलूपही लावलेलं नसतं. गावात एक कम्युनिटी लायब्ररी आहे, जिथून कोणीही पुस्तक घेऊ शकतं, वाचून झाल्यावर परत ठेवू शकतं कोणतही रजिस्टर, कोणतीही तपासणी नाही.