
हौसेला मोल नसतं असं म्हणतात. बरेच लोकं त्यांच्या आवडीसाठी पाण्यासारखा पैसा खर्च करून एखादी वस्तू विकत घेतात. पण अवघ्या 1 वर्षाच्यी लेकीसाठी पित्याने कस्टमाइज करून कोट्यवधींची कार विकत घेतल्याची बातमी सध्या सोशल मीडियावर धूमाकूळ घालत्ये. दुबईमध्ये राहणाऱ्या एका भारतीय व्यावसायिकाची सर्वत्र चर्चा होत आहे. या चर्चेमागचं कारण म्हणजे त्याने त्याच्या 1 वर्षाच्या मुलीला गिफ्ट म्हणून गुलाबी रंगाची रोल्स रॉयस ही अत्यंत महागडी कार दिली आहे. दुबईमध्ये राहणाऱ्या या व्यावसायिकाचे नाव सतीश संपाल (Satish Sanpal) आहे. लेकीचं बर्थडे गिफ्ट म्हणून सतीश यांनी त्यांच्या लाडक्या लेकीसाठी हे गिफ्ट दिलं असून त्याचा व्हिडीओ सगळीकडे व्हायरल झाला आहे.
सतीश संपाल हे ANAX होल्डिंगचे अध्यक्ष आहेत. ANAX होल्डिंग हा एक मोठा समूह आहे ज्याचे मूल्य 3 अब्ज डॉलर्स आहे. या गटात अनेक कंपन्या समाविष्ट आहेत. या ग्रुपचे मूल्य सुमारे 3 अब्ज डॉलर्स आहे. त्याच सतीश संपाल यांनी त्यांच्या पत्नीसह रोल्स-रॉइस कारच्या चाव्या मुलगी इसाबेलाला दिल्या, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे.
पिंक कलरची कस्टमाईज रोल्स रॉइस गिफ्ट
दुबईमध्ये राहणारे सतीश संपाल यांनी त्यांच्या 1 वर्षाच्या लाडक्या लेकीसा गुलाबी रंगाची रोल्स-रॉइस भेट दिली, जी कस्टमाइज्ड आहे. या कस्टमाइज्ड रोल्स-रॉइसमध्ये, पुढच्या आणि मागच्या सीटवर इसाबेलाचे नाव लिहिलेले आहे आणि सीटवर गुलाबी आणि पांढऱ्या रंगाचे कव्हर वापरले आहेत.
याच गुलाबी रंगाच्या रोल्स-रॉइस कारवर ‘Congratulations Isabella’ (अभिनंदन इसाबेला) असंही लिहीण्यात आलं आहे. ही कार स्पेशली इसाबेलासाठी इंग्लंडमध्ये बनवण्यात आल्याचं एका चिठ्ठीत लिहीलं आहे. नंतर ही कार यूएईमधून आयात करण्यात आली.
रोल्स रॉईसची किंमत कितीपासून होते सुरू ?
रोल्स रॉईस ही अत्यंत आलिशान आणि महागड्या गाड्यांपैकी एक आहे. भारतात रोल्स-रॉइस कारची किमंत 6.95 कोटी रुपयांपासून सुरू होते आणि 10.48 कोटी रुपयांपर्यंत जाते. रोल्स-रॉइस कारची किंमत ही तिच्या मॉडेल आणि वैशिष्ट्यांवर अवलंबून असते.