Viral Mahakumbh Girl Monalisa : कुंभमेळ्यातील व्हायरल गर्ल मोनालिसाचा सौंदर्यामुळे व्यवसाय ठप्प, आजोबांचे दुःख अनावर…

कुंभमेळ्यादरम्यान व्हायरल झालेली सुंदर मुलगी मोनालिसाला जवळपास सगळेच ओळखू लागले आहेत. पण आता हे सौंदर्य मोनालिसासाठी अडचणीचं कारण ठरलं आहे. ज्या कामासाठी ती प्रयागराजला आली होती, ती कामे आता होत नाहीत. मोनालिसाच्या आजोबांच्या म्हणण्यानुसार, तिला आता घरी परत जायचे आहे.

Viral Mahakumbh Girl Monalisa : कुंभमेळ्यातील व्हायरल गर्ल मोनालिसाचा सौंदर्यामुळे व्यवसाय ठप्प, आजोबांचे दुःख अनावर...
Monalisa
| Edited By: | Updated on: Jan 22, 2025 | 2:01 PM

प्रयागराज कुंभमेळ्यात इंदूरची मोनालिसा तिच्या सुंदर तपकिरी डोळ्यांमुळे आणि लूकमुळे व्हायरल झाली होती, पण आता हीच तिची सर्वात मोठी अडचण बनली आहे. मोनालिसाच्या आजोबांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांचे कुटुंब रुद्राक्षाच्या माळी विकून कमाई करते. मोनालिसा फेमस झाल्यापासून त्यांचं काम पूर्णपणे बंद झालं आहे. त्यांना आता त्यांच्या माल विकता येत नाही. लूकमुळे व्हायरल झालेल्या मोनालिसाच्या मुलाखती घेण्यासाठी लोकं तिच्या भोवती फिरत आहेत, म्हणूनच मोनालिसाला आता घरी परतायचे आहे. असे तिच्या आजोबांनी सांगितले आहे.

मोनालिसा मूळची खरगोन जिल्ह्यातील महेश्वरची रहिवासी आहे. असून तिचे कुटुंब सुमारे ३५ ते ४० वर्षांपासून महेश्वरयेथे वास्तव्यास आहे. तिचे नातेवाईक महेश्वरच्या घाटावर हार विकतात. महेश्वरमध्ये राहणारे तिचे आजोबा लक्ष्मण यांनी सांगितले की, ज्या प्रकारे मोनालिसा तिच्या डोळ्यांमुळे आणि सौंदर्यामुळे प्रयागराजमध्ये प्रसिद्ध झाली आहे, त्याचप्रमाणे तिचे कुटुंबही आता प्रकाशझोतात आले आहे. मात्र यामुळे त्यांच्या व्यवसायावर मोठा परिणाम झाल्याची खंत यावेळी आजोबांनी व्यक्त केली.

आजोबांनी सांगितले की, मोनालिसा कुटुंबासोबत व्यवसाय करण्यासाठी प्रयागराजला गेली होती. पण मोनालिसाच्या प्रसिद्धीमुळे त्यांचा संपूर्ण व्यवसाय ठप्प झाला आहे. मोनालिसा आणि तिचे वडील महेश्वरला पुन्हा माघारी घरी येण्याबद्दल बोलत आहेत.

कर्ज कसे फेडणार?

मोनालिसाचे आजोबा लक्ष्मण यांनी सांगितले की, मोनालिसा ही तिच्या आजोबांना महेश्वरला परत येण्याबाबत सतत मेसेज करत असते. पण संपूर्ण कुटुंबाने प्रयागराज कुंभमेळ्यात वस्तू विकून काही पैसे कमवू यासाठी व्यवसाय सुरु केला . यासाठी प्रयागराजच्या या महाकुंभमेळ्यात रुद्राक्षाच्या माळा आणि मोत्यांचे हार आणि पूजेचे साहित्य विकण्यासाठी त्यांनी लाखो रुपयांच्या वस्तूही खरेदी केल्या होत्या. त्यांनी विकत घेतलेल्या वस्तू काही नातेवाईकांच्या मदतीने आणि काही पैसे उधार घेऊन खरेदी केल्या होत्या. मात्र, मोनालिसाच्या प्रसिद्धीमुळे आम्ही खरेदी केलेल्या वस्तू आता विकल्या जात नाहीत. आम्ही घेतलेले कर्ज कसे फेडणार याची चिंता आम्हाला सतावत असल्याचं दुःख त्यांनी यावेळी सांगितले.

प्रसिद्धीचा कुटुंबालाही त्रास

प्रयागराजमधील कुंभमेळ्यात कुटुंबातील एखादा सदस्य वस्तू विकत असेल त्यानं समजलं कि मोनालिसाच्या नातेवाईक आहेत तर तिथेही लोक त्यांना त्रास देत आहेत.