निराश होऊन क्रिकेट प्रेमींनी मिम्स बनवले, राग असा व्यक्त केला!

टॉस गमावून फलंदाजीला उतरलेल्या टीम इंडियाची सलामी जोडी पूर्णपणे अपयशी ठरली. विराट आणि हार्दिकच्या अर्धशतकांमुळे टीम इंडिया कशी बशी 168 धावा करू शकली.

निराश होऊन क्रिकेट प्रेमींनी मिम्स बनवले, राग असा व्यक्त केला!
semifinal memes
Image Credit source: Social Media
| Edited By: | Updated on: Nov 10, 2022 | 7:22 PM

टी-20 वर्ल्ड कप 2022 च्या दुसऱ्या सेमीफायनलमध्ये इंग्लंडने भारताचा पराभव केला आणि यासोबतच टीम इंडियाचा विश्वचषकाचा प्रवास संपला. इंग्लंडचा सलामीवीर ॲलेक्स हेल्स आणि कर्णधार जोस बटलर यांनी शतकी भागीदारी केली ज्यामुळे भारताला १० गडी राखून पराभव पत्करावा लागला. टॉस गमावून फलंदाजीला उतरलेल्या टीम इंडियाची सलामी जोडी पूर्णपणे अपयशी ठरली. विराट आणि हार्दिकच्या अर्धशतकांमुळे टीम इंडिया कशी बशी 168 धावा करू शकली.

इंग्लंड संघासमोर आपल्या संघाची गोलंदाजी अपयशी ठरली आणि चार षटकांपूर्वी भारताने सामना गमावला, ही वस्तुस्थिती होती. #INDvsENG ट्विटरवर टॉप ट्रेंड करत आहेत.

चाहत्यांनी केएल राहुलला तातडीने संघातून हटवण्याची मागणी केली तर चहलसारख्या चतुर गोलंदाजाला ऑस्ट्रेलियात फिरायला नेलं होतं का? असा प्रश्नही अनेकांनी विचारला. लोक मीम्स शेअर करून टीम इंडियाला ट्रोल करत आहेत.