
कंटेट क्रिएटर सोफिक एसकेवरुन सोशल मीडियावर मोठा वाद झाला होता. त्याचा गर्लफ्रेंडसोबतचा प्रायवेट व्हिडिओ लीक झाला होता. त्या लीक झालेल्या क्लीपबद्दल त्याने सर्वांची माफी मागितली. सोफिक एसके हा बंगाली कंटेट क्रिएटर आहे. आता या इन्फ्लुएंसरने एका बंगाली ट्रॅकवर डान्स करतानाचा नवीन व्हिडिओ पोस्ट केला आहे. या लीक झालेल्या प्रायवेट व्हिडिओमुळे सोफिक एसकेला मोठ्या प्रमाणात ट्रोलिंगचा सामना करावा लागलेला. पण या ट्रोलिंगचचा त्याला आता फायदा झाल्याचं दिसत आहे. इन्स्टाग्रामवर त्याची फॉलोईंग 4.96 लाखाने वाढली आहे.
दोन दिवसांपूर्वी त्याने माफी मागितली. त्यानंतर आता या सर्व वादातून बाहेर येत सोफिक एसकेने नवीन डान्स रील अपलोड केली आहे. अचानक त्याचे फॉलोअर्स वाढल्यानंतर आता नव्या कंटेटबद्दल मत भिन्नता दिसून येत आहे. समर्थन करणाऱ्या काही फॉलोअर्सनी त्याने पुन्हा कंटेट मेकींग सुरु केल्याबद्दल आनंद व्यक्त केला. त्याचं स्वागत केलं आहे. काही जण लीक झालेल्या त्या प्रायवेट व्हिडिओवरुन अजूनही त्याच्यावर टीका करतायत. कमेंट सेक्शनवर नजर टाकली तर हे लक्षात येईल.
सोफिकचा व्हिडिओ कसा लीक झाला?
या व्हायरल झालेल्या क्लीपबद्दल माफी मागताना सोफिकने हा व्हिडिओ कसा लीक झाला? त्या बद्दल स्पष्टीकरण दिलं होतं. हा व्हिडिओ वर्षभरापूर्वी रेकॉर्ड करण्यात आलेला असा सोफिकचा दावा आहे. एका जवळच्या मित्राकडे त्याचा आणि त्याच्या गर्लफ्रेंडच्या फोनचा एक्सेस होता. त्याने ती क्लीप शोधून काढली व तो ब्लॅकमेल करत होता असा सोफिकचा दावा आहे.
अशा प्रकारे विश्वासघात
मित्राचं हे कृत्य समजल्यानतर मी त्याच्यापासून लांब झालो. पण त्याने ऑनलाइन क्लीप अपलोड केली. “ज्याला मी माझ्या भावासारखी वागणूक दिली तो अशा प्रकारे विश्वासघात करेल याची मी कल्पना केली नव्हती” असं सोफिक बंगालीमध्ये म्हणाला.
ही क्लिप आणखी शेअर करु नका
इन्फ्लुएंसरने हा पब्लिसिटी स्टंट नव्हता हे सिद्ध करण्यासाठी काही पुरावे दिले. सोफिकने स्क्रीनशॉट, त्या मित्राची शॉर्ट क्लिप आणि काही व्हॉइट नोट शेअर केले. पब्लिसिटीसाठी मी किंवा माझ्या गर्लफ्रेंडने हे सर्व केल्याचा आरोप त्याने फेटाळला. त्याने हात जोडून आपल्या फॉलोअर्सची माफी मागितली. ही क्लिप आणखी शेअर करु नका, असं त्याने आवाहन केलं. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर छपरी नहीं P*rn स्टार… अशा प्रकारच्या कमेंट करण्यात आल्या होत्या.