Khan Sir Viral Video : खान सर मदत करतायत की PR? बिहारच्या पूरातील व्हायरल व्हिडिओंवर सोशल मीडियावर चर्चा
बिहारमध्ये पूरपरिस्थिती निर्णाण झाली आहे. त्यात खान सरांचे मदतकार्याचे व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. त्यामुळे खान सर मदत करत आहेत की मदत करण्याचा दिखावा करत आहेत असा प्रश्न निर्माण झाला आहे.

बिहारमध्ये पावसान थैमान घातलयं. बऱ्याच गावांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. बिहारमधील सखल गाव पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत. नागरिकांना पुराच्या विळख्यातून बाहेर काढत अनेक सेवाभावी संस्था मदतकार्य करत आहेत. त्यातच बिहारचे खान सर चक्क पुराच्या पाण्यात उतरून नागरिकांना अन्न पुरवत आहे. त्यांचाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. पण या व्हिडिओंची एवढी चर्चा होण्यामागे मदतकार्य आहे की त्यासोबत PR त्याचाही मोठा भाग आहे? सोशल मिडियावर आता याच मुद्द्यावरन वेगवेगळ्या प्रतिक्रिया पाहायला मिळत आहे.
खान सरांचा मदतकार्याचा व्हिडिओ
व्हायरल व्हिडिओमध्ये खान सर बोटीवरून पूरग्रस्त भागात अन्नपदार्थाचे वाटप करताना दिसत आहेत. त्यांच्या हातात वॉकी – टॉकी असून त्याद्वारे ते इतर बोटींवरील टिमला सूचना देताना दिसत आहे. याशिवाय रात्रीच्या वेळी मुलांच्या सुरक्षिततेचा विचार करून मदतवाटप सकाळी करण्याच्या सूचना देतानाही दिसत आहेत.
फोटो आणि व्हिडिओंची चर्चा
खान सर मदतकार्य करतानाचे १ – २ नव्हे तर अनेक व्हिडिओ सोशल मिडीयावर वेगाने व्हायरल होत आहेत. काही व्हिडिओमध्ये ते स्वत: मदत करताना दिसत आहेत. तर एका व्हिडिओमध्ये त्यांचे डोके दुखत आहेत तरी ते मदत करत आहेत अशा प्रकारचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत. त्यामुळे मदतकार्य करत आहेत की मदत करण्याच नाटक.
Khan Sir बेचारे बिहार का भगवान बनकर अकेले सबकी मदद कर रहे हैं
किसी एक आदमी को अपने management का कष्ट देना नहीं चाहते हैं
गजब गजब Reels कट रहा है
PR बोलता है सर अंगुली ऐसे करिए इस बार इस एंगल से लेंगे अब लेट जाएगा इस बार मलहम पट्टी कर लीजिएगा ,,
अरे बीमार है तो बैठ जाइए -अपना… pic.twitter.com/XvFGLNwzlD
— Ranjan Singh (@RanjanSinghh_) September 20, 2026
मदत की PR सोशल मीडियावर चर्चा
काही सोशल मिडिया यूजर्सना खान सरांचा हे मदतकार्य कौतुकास्पद वाटत आहे, तर काही जण प्रत्येक हालचालीचे व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होण हे PR साठी केलेली नाटक वाटत आहेत. सोशल मिडिया चर्चांमध्ये मदत करत असतील तर त्याची प्रसिद्धी करण्यात गैर काय असा प्रश्न विचारत आहेत. तर काही जणांना मदतकार्याचं प्रदर्शन करण्याची काय गरज, असा सवाल करत आहेत.
मात्र खान सरांनी हे व्हिडिओ स्वत: PR साठी तयार केले किंवा त्यामागे प्रामाणिक मदतकार्याचाच हेतू होता हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे हा व्हिडिओ सध्या हा मुद्दा सोशल मीडियावरील चर्चेपुरताच मर्यादित आहे
