Video Viral Jagannath Puri : जोरदार वादळ, तुफान वारा तरीही हलला नाही जग्गनाथ मंदिरावरचा ध्वज, व्हिडिओ पाहून नेटकरी म्हणाले….
अर्नब चक्रिवादळात दक्षिण भारतात मोठे नुकसान झाले, याचा फटका ओडिशा जग्गनाथ पूरीच्या मंदिरालाही बसला. तुफान वादळातही मंदिरावरचा ध्वज फडफडताना दिसतोय, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

अर्नब चक्रीवादळामुळे दक्षिण भारतात प्रचंड नुकसान झाले. जनजीवन विस्कळीत झाले. मोठं मोठी झाडे उमळून पडली, घरांचे नुकसान झाले. समुद्रकिनाऱ्यालगत असणाऱ्या गावांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी शिरले. या वादळाचा फटका ओडिशाच्या जग्गनाथपुरीच्या मंदिरालाही बसला. चक्रिवादळात फडफडणाऱ्या मंदिरावरच्या ध्वजाचा व्हिडिओ व्हायरल झाला. ज्यामुळे सर्वत्र चर्चा रंगली आहे.
व्हायरल व्हिडिओमध्ये पुरीच्या प्रसिद्ध जगन्नाथ मंदिराचा परिसर आणि मंदिराच्या उंच शिखरावर फडकणारा ध्वज दिसत आहे. चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर परिसरात जोरदार वारे वाहत आहेत. वादळी पाऊस पडत असल्याचे दिसते आहे. मात्र जग्गनाथ मंदिरावरचा ध्वज मात्र वादळातही दिमाखात फडकत असल्याचा दावा करण्यात येत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच सर्वांचे मन वेधून घेतले आहे.
खरं तर जग्गनाथ मंदिर आणि मंदिराच्या शिखरावरील ध्वज यांचं भाविकांच्या मनात विशेष महत्त्व आहे. या मंदिरात रोज ध्वज बदलण्याची परंपरा आहे. मंदिरातील सेवायत मंदिराच्या उंच शिखरावर चढून हा ध्वज बदलतात. विशेष म्हणजे ही परंपरा अनेक वर्षांपासून सुरू आहे.
चक्रिवादळ अर्नबच्या पार्श्वभूमीवर हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी त्याला धार्मिक श्रद्धेशी जोडलं आहे. काही जणांनी जगन्नाथाच्या कृपेने मंदिराचा ध्वज सुरक्षित राहिल्यातं म्हटलं आहे. तर काहींनी या दृश्याला दैवी संकेत मानलं आहे.
मात्र व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या दृश्यांवरून ध्वज चक्रिवादळच्या संपूर्ण काळात सुरक्षित होता किंवा त्यामागे चमत्कार आहे. असं ठामपणे सांगता येत नाही. व्हिडिओ कधी शूट करण्यात आला? त्यावेळी काय हवामान होते. याची पडताळणी केलेली नाही. तरीही या व्हिडिओमुळे जगन्नाथ मंदिराची परंपरा आणि भाविकांची श्रद्धा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.