VIDEO | शेतात डीजे लावून गव्हाची कापणी, शेतकऱ्यांचा जुगाड पाहून नेटकरी म्हणतात…

तुम्ही कधी शेती करीत असताना डीजे लावला आहे का ? सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यामध्ये तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी पाहायला मिळणार आहेत.

VIDEO | शेतात डीजे लावून गव्हाची कापणी, शेतकऱ्यांचा जुगाड पाहून नेटकरी म्हणतात...
Viral Video
Image Credit source: tv9marathi
| Updated on: Apr 11, 2023 | 12:22 PM

मुंबई : तुम्हाला एखाद्या लग्नाच्या समारंभात, वाढदिवसाच्या पार्टीत, नाहीतर एखाद्या गावात प्रत्येक ठिकाणी लोकं डीजेवर (Dj Song) नाचताना दिसतात. मग लग्न गावाला असो किंवा शहरात असो…पण तुम्ही कधी शेतकऱ्यांनी डीजे लावून गहू कापताना पाहिलं आहे का ? नसेल पाहिलं तर सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झालेला व्हिडीओ एकदा पाहून घ्या, त्यानंतर तुम्हाला माहिती होईल लोकं किती हटके काम करीत आहेत. शेतात लोकांच्या मनोरंजनासाठी डीजे लावल्यामुळे तो व्हिडीओ व्हायरल (Viral Video) झाला आहे.

व्हायरल झालेल्या त्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, लोकं शेतात काम करीत आहेत. शेतात एका बाजूला डीजे वाजत आहे. विशेष म्हणजे डीजेला रंगीबेरंगी लाईट सुद्धा लावण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर त्यावर नागिन धून लावून हरियाणी गाणी वाजवली जात आहेत. एक व्यक्ती तिथं उभं राहून डान्स करीत असल्याचं पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर काही लोकं गहू सुध्दा कापत आहेत.

मग आता सांगा की तुम्ही आतापर्यंत अशा पद्धतीने गहू कापताना कधी पाहिलं आहे का ? हा व्हिडीओ लोकांना अधिक आवडला आहे. त्याचबरोबर हा व्हिडीओ इंन्स्टाग्रामवरती bhulal_choudhary नावाच्या व्यक्तीने शेअर केला आहे. त्यावर अनेक लोकांनी मजेशीर कमेंट केली आहे. एका नेटकऱ्याने लिहीले आहे की, ‘ते म्हणतात तुम्हाला संधी आहे’. दुसऱ्याने लिहिले की, हा हरियाणा भाई आहे.

आतापर्यत सोशल मीडियावर असे मजेशीर अनेक व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. त्याचबरोबर लोकांना असे व्हिडीओ सुध्दा अधिक आवडले आहेत.