#KanganaRanaut सोशल मीडियावर टॉप ट्रेंडिंग!

ट्विटरवर कंगना रणौतच्या पुनरागमनाच्या बातमीने चाहत्यांमध्ये आनंदाची लाट उसळली आहे. ट्विटरवर #KanganaRanaut टॉप ट्रेंडिंग आहे. युजर्स वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया देत आहेत.

#KanganaRanaut सोशल मीडियावर टॉप ट्रेंडिंग!
kangana is back on twitter
Image Credit source: Social Media
| Updated on: Jan 25, 2023 | 2:00 PM

बॉलिवूडची स्पष्टवक्ती अभिनेत्री म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कंगना रणौतच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर ती परतली आहे. तिने स्वत: ट्विटच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे. तिने ट्विटमध्ये लिहिले की, ‘हॅलो मित्रांनो. परत येऊन खूप छान वाटतंय.” तब्बल दीड वर्षांनंतर ही अभिनेत्री ट्विटरवर परतली आहे.

तिने आपल्या ‘इमर्जन्सी’ या चित्रपटाचा Behind The Scene व्हिडिओही ट्विटरवर शेअर केला असून चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीखही जाहीर केली आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण झाल्याची माहिती तिने ट्विटवर दिली आहे. हा चित्रपट 20 ऑक्टोबर 2023 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

ट्विटरवर कंगना रणौतच्या पुनरागमनाच्या बातमीने चाहत्यांमध्ये आनंदाची लाट उसळली आहे. ट्विटरवर #KanganaRanaut टॉप ट्रेंडिंग आहे. युजर्स वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया देत आहेत. कुणी ‘वेलकम बॅक क्वीन’ म्हणतंय, तर कुणी तिच्या सिनेमाचं कौतुक करत आहे.

एका युजरने लिहिले आहे की, ‘इमर्जन्सी हा कंगना रनौतचा आतापर्यंतचा सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरणार आहे’, तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे की,’बॉक्स ऑफिस कमाईत हा चित्रपट क्वीनला मागे टाकेल’. तर काही युजर्सनी मीम्सच्या माध्यमातून ट्विटरवर परतल्याबद्दल त्यांचे अभिनंदनही केले आहे, काही युजर्स आश्चर्यचकित आणि अस्वस्थही झाले आहेत.

कंगना रनौतने ट्विटरवर मीम्स शेअर केले आणि लोकांनी म्हटले, ‘शहरात दवंडी वाजवा’