Khan Sir Rakhi 2025: डॉक्टरांना बोलवा, माझा रक्तप्रवाह थांबलाय…खान सरांना 15000 बहिणींनी बांधली राखी, पाहा Viral Video

Khan Sir Raksha bandhan : खान सराची लोकप्रियता केवळ बिहार अथवा उत्तर भारतापूर्ती मर्यादीत नाही. देशभरातील विद्यार्थी त्यांचा आदर करतात, त्यांचे जीवन घडवणारे व्हिडिओ बघतात. त्यांच्यावरील विद्यार्थ्यांचे प्रेम रक्षा बंधनानिमित्त पुन्हा दिसून आले.

Khan Sir Rakhi 2025: डॉक्टरांना बोलवा, माझा रक्तप्रवाह थांबलाय...खान सरांना 15000 बहिणींनी बांधली राखी, पाहा Viral Video
| Updated on: Aug 10, 2025 | 1:32 PM

खान सरांना कोण ओळखत नाही. ते विद्यार्थ्यांचे लाडके शिक्षक आहेत. केवळ बिहारच नाही तर त्यांची ओळख उभ्या देशाला आहे. खान सरांनी दरवर्षीप्रमाणे यंदाही रक्षा बंधन साजरे केले. त्यांच्या हातावर 15,000 हून अधिक विद्यार्थिनींनी राखी बांधली. हा अनोखा सोहळा होता. खान सरांच्या क्लासमध्ये मुलांपेक्षा मुलींची संख्या अधिक आहे. त्यामुळे त्यांनी पाटणामधील श्रीकृष्ण मेमोरियल हॉल अगोदरच राखीव ठेवला होता.पूर्वी रक्षा बंधनाचा कार्यक्रम त्यांच्याच क्लासमध्ये होत होता. आपल्या लाडक्या बहिणींसाठी या भाऊरायाने 156 प्रकारच्या मिठाई आणि अन्न पदार्थ ठेवले होते. राखी बांधण्यासाठी एकच गर्दी उसळली होती.

लांबच लांब रांग

राखी बांधण्यासाठी खान सर मंचावरील एका सोप्यात बसून होते. तर मुलींची लांबच लांब त्यांना राखी बांधण्यासाठी दिसून आली. सकाळी 10 वाजेपासून लाडक्या बहिणी त्यांना राखी बांधण्यासाठी उत्सुक दिसून आल्या. त्यांच्या हातावर राख्यांचा जणू पाऊस पडला. त्यांचा हातावर राखी बांधण्यासाठी जागाच उरली नाही. 15000 हून अधिक विद्यार्थिनींनी त्यांच्या हातावर राखी बांधली. त्यांचा हात जणू सुन्न झाला होता. तेव्हा त्यांनी मिश्किलपणे आता डॉक्टरला बोलवा, माझ्या हातातील रक्तप्रवाह थांबला आहे, असं म्हटलं. अर्थात राखी बांधण्याचा कार्यक्रम नॉनस्टॉप सुरूच होता.

खान सर सर्वात खास भाऊ

यावेळी राखी बांधणाऱ्या विद्यार्थिनींनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या. खान सर तर एकदम चांगले शिक्षक आहेतच. पण संपूर्ण पाटण्यात आम्हाला त्यांची क्लासरूम सर्वाधिक सुरक्षित वाटते. सर आम्हाला इतक्या कमी शुल्कात शिकवत आहेत, हीच त्यांच्याकडून आमच्यासाठीचे सर्वात मोठे गिफ्ट आहे. रक्षा बंधनाच्या दिवशी अनेक कोर्समध्ये खान सरने मोठी सूट दिली, त्यांनी आम्हाला मोठे गिफ्ट दिले, असे सांगत या मुलींच्या डोळ्यात पाणी तरळले. सोशल मीडियावर या रक्षा बंधन सोहळ्याच अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्यातील एका युझर्सने शेअर केलेले ह व्हिडिओ आहे.

सर, वहिनी कुठंय…

खान सर, मंचावर बसलेले होते. अनेक बहिणी येऊन त्यांना राखी बांधत होत्या. त्याचवेळी अनेक मुलींनी सर वहिनी कुठंय असा एकच धोशा लावला. त्यांना सोबत का आणलं नाही, अशी विचारणा केली. त्यावर आज खास बहिणींचा दिवस आहे, तिथे वहिनीचे काय काम, असे मिश्किल उत्तर दिले. खान सरांना सख्खी बहीण नाही. त्यामुळे ते क्लासमधील विद्यार्थिंनीनाच त्यांची बहीण मानतात. दरवर्षी खान सरांच्या क्लासवर रक्षा बंधन साजरे केले जाते.