हे बघून तुम्हाला बिबट्याच्या ताकदीचा अंदाज येईल, थक्क करणारा व्हिडीओ!

Leopard attack: हा प्राणी एका झटक्यात आपल्या शिकारीवर तुटून पडतो. दिसायला सिंह आणि वाघापेक्षा तो खूपच लहान असला तरी तो अतिशय चपळ आणि दुष्ट भक्षक आहे. झाडावर नेऊन तो आपल्या शिकारीचा आनंद घेतो. सध्या असाच काही व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामुळे हा बिबट्या किती शक्तिशाली आहे याची ही कल्पना येईल.

हे बघून तुम्हाला बिबट्याच्या ताकदीचा अंदाज येईल, थक्क करणारा व्हिडीओ!
Leopard attack
| Updated on: Jun 08, 2023 | 1:54 PM

मुंबई: बिबट्याची गणना धोकादायक आणि निर्दयी शिकारी प्राण्यांमध्येही केली जाते. याला सायलेंट किलर असेही म्हणतात. हा प्राणी एका झटक्यात आपल्या शिकारीवर तुटून पडतो. दिसायला सिंह आणि वाघापेक्षा तो खूपच लहान असला तरी तो अतिशय चपळ आणि दुष्ट भक्षक आहे. झाडावर नेऊन तो आपल्या शिकारीचा आनंद घेतो. सध्या असाच काही व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामुळे हा बिबट्या किती शक्तिशाली आहे याची ही कल्पना येईल.

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की बिबट्याने स्वतःपेक्षा मोठ्या हरणाला ठार मारले आहे. यानंतर हरणाला तो आपल्या जबड्यात धरून झाडावर चढू लागतो. धक्कादायक बाब म्हणजे हरणाचे शरीर जड असूनही बिबट्या सहजपणे त्याला जबड्यात पकडून वर झाडावर नेतो. या व्हिडिओतील भयानक शिकारी बिबट्याची ताकद पाहून नेटिझन्स हैराण झाले आहेत.

बिबट्याचा हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे. युजरने कॅप्शन दिले आहे, लेपर्ड पॉवर. व्हायरल झालेली ही क्लिप अवघ्या काही सेकंदांची आहे, पण ती पाहून लोक आश्चर्यचकित झाले आहेत. कमेंट सेक्शनमधील प्रत्येकजण हेच सांगत आहे, हा प्राणी खरोखरच शक्तिशाली आहे.

हा व्हिडिओ आतापर्यंत शेकडो लोकांनी लाइक केला आहे, तर लोक सातत्याने आपल्या प्रतिक्रिया नोंदवत आहेत. एका युजरने सांगितले की, हा व्हिडिओ पाहिल्यानंतर त्याला हसू आले. तर आणखी एकाने सांगितले की, हे हरण बिबट्या एवढ्याच आकाराचे होते. तरीही शिकारीने त्याला आरामात उचलले. एकूणच बिबट्याने आपल्या अद्भुत शक्तीने नेटकऱ्यांना थक्क केले आहे.