गर्दीला जे सुचलं नाही ते चिमुकलीला सुचलं; तिच्या माणुसकीला लोकं म्हणाली…

असे व्हिडीओ पाहून माझ्या मनामध्ये वेगळ्या प्रकारच्या भावना येताता.या व्हिडिओवर कमेंट करताना आणखी एका युजरने लिहिले आहे - इंटरनेटवर असे व्हिडीओ पाहिल्यानंतर मी भावूक होतो.

गर्दीला जे सुचलं नाही ते चिमुकलीला सुचलं;  तिच्या माणुसकीला लोकं म्हणाली...
| Updated on: Apr 12, 2023 | 12:58 AM

मुंबई : सोशल मीडियावर कधी कुठला व्हिडिओ व्हायरल होईन हे सांगता येत आहे. त्यातील काही व्हिडिओ हे खूप भावूक असतात. आगळ्या वेगळ्या माणुसकीचे दर्शन ते घडवतात. असे पाहून आपण खूप भावूक होतो. नुकताच ट्विटरवर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये एक लहान मुलगी एका असहाय वृद्धाला स्वतःच्या हाताने पाणी पाजत असल्याचे दिसून येत आहे. हा व्हिडिओ खूप भावूक आणि निरागस आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेक जण थक्क झाले आहेत. व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओवर यूजर्सने अनेक चांगल्या कमेंट दिल्या आहेत.

जो व्हायरल झालेला व्हिडिओ आहे त्यामध्ये दिसत आहे की, एक मुलगी रस्त्याच्या कडेला बसलेल्या एका असहाय वृद्धाला पाणी देत ​​आहे. एका वृद्धाला पाणी देताना ती लहान मुलगी इतक्या प्रेमाने आणि मायेने पाणी पाजत आहे की, अनेकांनी त्या व्हिडिओवर चांगल्या चांगल्या कमेंट केल्या आहेत.

हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये एक कॅप्शनही लिहिले आहे. कॅप्शनमध्ये लिहिले आहे की असे हे सुंदर क्षण जपून ठेवले पाहिजे.

 

आपल्या मुलांमध्ये ही भावना कोणत्याही पैशापेक्षा अधिकच जास्त आहे. या व्हिडिओला 99 हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. त्याचबरोबर या व्हिडिओवर अनेकांनी कमेंट दिल्या आहेत.

कमेंट करताना एका यूजरने लिहिले आहे – यापेक्षा सुंदर व्हिडिओ मी पाहिलेला नाही.तर एकाने लिहिले आहे की, असे व्हिडीओ पाहून माझ्या मनामध्ये वेगळ्या प्रकारच्या भावना येताता.या व्हिडिओवर कमेंट करताना आणखी एका युजरने लिहिले आहे – इंटरनेटवर असे व्हिडीओ पाहिल्यानंतर मी भावूक होतो.

लहान मुलं असं करत असली तरी त्यांच्यावर होणारे संस्कारही त्यातून दिसून येतात असंही एका युजरने म्हटले आहे. वृद्धाला पाणी पाजत असतानाच्या या व्हिडिओमुळे सोशल मीडिया प्रचंड भावूक झाला आहे.