Mahadevi Elephant in Vantara : आधी मॉर्निंग वॉक, नंतर अंघोळ, मग…’वनतारा’त महादेवीचं कसं असतं रूटीन? सकाळ ते संध्याकाळपर्यंत प्रत्येक क्षण कॅप्चर..

महादेवी हत्तीण गुजराजतमध्ये वनतारा येथील ज्या केंद्रात राहते, त्यानी सोशल मीडियाच्या माध्यमातून तिचा एक खास व्हिडीओ शेअर केला आहे. त्यामध्ये तिचा सकाळपासून ते संध्याकाळापर्यंतचा संपूर्ण दिनक्रम कसा असतो?

Mahadevi Elephant in Vantara : आधी मॉर्निंग वॉक, नंतर अंघोळ, मग...वनतारात महादेवीचं कसं असतं रूटीन? सकाळ ते संध्याकाळपर्यंत प्रत्येक क्षण कॅप्चर..
महादेवी हत्तीणीचं रूटीन काय ?
Image Credit source: social media
| Updated on: Aug 05, 2025 | 1:12 PM

कोल्हापूरजवळच्या नांदिणी मठात गेल्या 30 वर्षांपेक्षा अधिक काळ राहणाऱ्या माधुरी उर्फ महादेवी हत्तीणीशी लोकांच्या भावना जोडलेल्या आहेत. अनेकांना त्या हत्तीणीचा लळा आहे. मात्र काही दिवसांपूर्वी ‘माधुरी’ ऊर्फ ‘महादेवी’ हत्तीण हिला नुकतच गुजरातच्या वनतारा प्राणी संवर्धन केंद्रात हलवण्यात आलं.तेव्हापासून स्थनिकांमध्ये रोषाचे, संतापाचे वातावरण असून ही हत्तीण मठात परत आणण्याची मागणी जोर धरत आहे. याचसंदर्भात आज मंत्रालयात एक महत्वाची बैठक पार पडली. त्य बैठकीत मुख्यमंत्र्यांनी लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून जनभावनाही जाणून घेतली आहे. यावर आता काय निर्णय होतो याकडे लक्ष लागले आहे.

मात्र याच दरम्यान ही महादेवी हत्तीण गुजराजतमध्ये वनतारा येथील ज्या केंद्रात राहते, त्यानी सोशल मीडियाच्या माध्यमातून तिचा एक खास व्हिडीओ शेअर केला आहे. त्यामध्ये तिचा सकाळपासून ते संध्याकाळापर्यंतचा संपूर्ण दिनक्रम अर्थात रूटीन कसं असतं, दिवसभर ती काय काय करते, हे व्हिडीओच्या माध्यमातून दाखवण्यात आलं आहे.

‘वनतारा’त महादेवीचा कसा असतो दिनक्रम ?

घड्याळाच्या काट्यांनी वेळ पुढे सरकत असताना माधुरी मात्र प्रत्येक हत्तीला हक्काचा आनंद देण्याची यादी पूर्ण करत आहे.

07:09 AM – दिवसाची सुरूवात आवडत्या खाण्याने होते.

07:35 AM – जंगलात मनमोकळं फिरते.

09:00 AM – विश्रांतीचा क्षण

09:30 AM – पाण्याचा स्पर्श आणि मायेची काळजी

10:06 AM – खाऊची वेळ

11:30 AM – जुन्या जखमांवर उपचार करणे

01:00 PM – दुपारची शांत विश्रांती आणि माझ्या अनुभवांचा वेळ

02:00 PM – आयुर्वेदिक उपचार

03 :00 PM – हळूहळू चालणे

03:50 PM – पाण्यातून संधीवातासाठी आराम

05 :25 PM – पाण्यातून हळूहळू परतण्याचा क्षण

06:03 PM – संध्याकाळी पुन्हा जंगलाच्या वाटेवर

ती आता कोणत्याही वेळापत्रकावर नाही. ती तिच्या बरे होण्याच्या प्रवासात आहे. प्रत्येक क्षण तिच्या निवडीतचा आहे, असा मेसेज व्हिडीओतून शेअर करण्यात आला आहे.

 

महादेवीला परत आणण्यासाठी मुख्यमंत्र्यांची मध्यस्थी 

दरम्यान वनतारा येथून महादेवी हत्तीणीला नांदणी मठात परत आणण्याच्या मागणीने जोर धरला असून त्यासाठी स्वाक्षरी मोहीमही राबवण्यात आली होती. याच मुद्यासंदर्बात आज  मुंबईत मंत्रालयात महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात आली. मुळात महादेवी हत्तीण ही वनतारा येथे पाठवण्याचा निर्णय सरकारचा नाही, तर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे पालन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. तरीही जनभावनेचा आदर करत आता आपण हत्तीण परत आणण्यासंदर्भात मध्यस्थी करणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.