Viral Video : लंडनच्या रस्त्यावर अवतरली भारतीय रिक्क्षा; आनंद महिंद्रांनी केली Video शेअर, नेटकरी म्हणाले…
UKच्या रस्त्यावर महिंद्रा रिक्षा धावताना दिसली आणि हा व्हिडिओ आनंद महिंद्रांच्या नजरेत आला. त्यांनी सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत खास गुजराती कॅप्शनही दिलं.

आपल्या रिक्षा दिसली तर त्यात काय नवीन नाही. हात केला,रिक्षा थांबवली आणि निघालो आपल्या कामाला.पण समजा हिच रिक्क्षा युकेमध्ये अचानक आपल्याला दिसली तर मग नक्कीच आश्चर्य वाटेल.
तिथली लोक हा काय प्रकार म्हणून बघतच बसतील. असंच काहीसं झालंय. UK च्या रस्त्यावर आता आपली महिंद्रा रिक्क्षा धावताना दिसली आणि हा व्हिडिओ आनंद महिंद्रा यांच्या नजरेत आला. त्यांनी हा व्हिडिओ आपल्या सोशल मिडिया अकाउंटवर शेअर केला आहे.
आनंद महिद्रांनी हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आणि गुजरातीमध्ये याला कॅप्शनही दिलंय. “युके मा रिक्क्षा आवी गई छे,महिंद्रा नी छे आपणा, म्हणजे काय तर UK मध्ये रिक्क्षा आली आहे. ती महिंद्राची आहे आणि आपलीच आहे. त्यांनी ही रिक्क्षा एक हौशी व्यक्तीने आणल्याचं सांगितलं आहे.
सकाळी स्टेशनला जायच, ऑफिसला पोहोचायचं, मार्केटला जायचंय….रिक्क्षा पकडली की काम झालं. हे आपलं रोजचचं काम आहे. पण जर UK ची लोक अस वागताना दिसली तर काही चुकीच वाटायला नको. त्यांनाही आता आपल्यासारखी सवय लागणार बहुतेक.
“UK ma riksha aavi gai chhe…
Mahindra ni chhe, aapda”
🙂
(Imported by a hobbyist) https://t.co/RQfw5sBnjJ
— anand mahindra (@anandmahindra) October 5, 2026
व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनीही मग आपली कमेंट्सची कला याला जोडली. कुणी याला रिव्हर्स कॉलोनायझेशन म्हटलं , तर कुणी म्हटलंय की आता UK च्या रस्त्यावर रिक्क्षा आलीच आहे तर HORN NO PLEASE आणि रिक्क्षांवर पोराबाळांची नावे पण लिहा तर ती खरी भारतीय वाटेल असंही लिहिलंय. काहीनी तर UK मध्ये रिक्क्षात बसून भाड्यावर घासाघीस कशी होईल हे देखील इमॅजिन केलंय.
म्हणजे बघा आता… भारतात हीच रिक्क्षा दिसली तर आपण तिला साधं वाहन समजतो. पण तीच रिक्क्षा लंडनच्या रस्त्यावर दिसली की अचानक तिचं महत्त्व वाढतं. आजूबाजूला परदेशी वाहन आणि त्यामध्येच आपली तीन चाकी रिक्क्षा… ही भारताला अभिमान वाटण्याची बाब आहे.