Viral: मोलकरणीने खरेदी केला शानदार 3BHK फ्लॅट,किंमत पाहून मालकीण उडालीच ! समोर आली ही कहाणी

एका घरकाम करणाऱ्या महिलेची एक कहाणी व्हायरल झाली आहे. तिने सुरतमध्ये ६० लाखांचा फ्लॅट विकत घेला आहे आणि त्यासाठी तिने केवळ १० लाखांचे लोन घेतलंय...हे ऐकून जो तो हैराण झाला आहे.

Viral: मोलकरणीने खरेदी केला शानदार 3BHK फ्लॅट,किंमत पाहून मालकीण उडालीच ! समोर आली ही कहाणी
| Updated on: Oct 09, 2025 | 9:18 PM

 

प्रत्येकाला असे वाटत असते की आपल्या डोक्यावर हक्काचे छप्पर असावे. परंतू आजच्या काळात महागाई इतकी वाढली आहे की स्वत:चे हक्काचे घर तर जाऊ द्या भाड्याने घर घेणेही अवघड झाले आहे. रोजच्या खर्चातून काही पैसे उरतच नाही तर तर बचत करणार कशी हा मोठा गहन प्रश्न निर्माण झाले आहे. काही वेळा तर आयुष्यभर कमाई करुनही एखादे घर घेता येत नाही.परंतू अलिकडे सोशल मीडियावर एक अशी कहानी समोर आली आहे की त्याने सर्वांनाच धक्का बसला आहे. कंटेन्ट क्रिएटर नलिनी उनागर यांनी सोशल मीडियावर पोस्ट केली आहे की त्यांच्या मोलकरणीने सुरतमध्ये 60 लाख रुपये फ्लॅट खरेदी केले आहे.

या गोष्टीने नलिनी एवढी हैराण झाली की त्यांनी तिची कहाणी शेअर केली आहे. नलिनीने सांगितले की नोकरानी केवळ फ्लॅट खरेदी केला, आणि त्यात तिने 4 लाख रुपये फर्निचरवर खरेदी केले आणि तिने लोन मात्र केवळ १० लाखाचे घेतले होते. नलिनीने पोस्टमध्ये लिहीलेय की एकदा तिची नोकरानी खूप खूश होती. मी तिला याचे कारण विचारले. तर तिने सांगितले, आज तिने सुरतमध्ये ६० लाख रुपये का 3BHK फ्लॅट खरेदी केला.तिने फर्निचर देखील चार लाखाचे खरेदी केले. आणि लोन केवळ दहा लाखांचे घेतल्याचे सांगितले तेव्हा आपल्याला धक्का बसला.

कसे काय केले ?

नलिनी हीने लिहीलेय की जेव्हा तिची आणखी चौकशी केली तेव्हा कळले की तिच्या मोलकरणीची वेलंजा गावात आधीच दोन मजली घर आणि एक दुकान आहे. दोन्ही तिने भाड्याने दिलेली आहेत. त्यामुळे नलिनी एकदमच आश्चर्यचकीत झाली. तिला नंतर कळले की असली जादू स्मार्ट सेव्हींग्सचे आहे. ही कहाणी या गोष्टीचा पुरावा आहे की जर माणसाने पैशांचा वापर योग्य वापर केला. अनावश्यक वस्तू खर्च न केल्यास,कोणतेही स्वप्न अशक्य नाही.

येथे पाहा पोस्ट –

नलिनी या पोस्टने सोशल मीडियावर चर्चा सुरु झाली आहे.काही लोकांनी या मोलकरणीचे कौतूक केले आणि त्यास प्रेरणादायी म्हटले आहे. तर काही लोकांना यावर विश्वास बसत नाही की सुरतमध्ये ६० लाखात थ्री बिचके फ्लॅट मिळेल. एका युजरने लिहिलेय सुरतमध्ये ६० लाखात 3BHK फ्लॅट ? हे खरे वाटत नाही. दुसऱ्या एका युजरने म्हटले की जर तिने हे सत्यात केले असेल तर तिचे कौतूक आहे.तिने केले ते शिकलेले लोकही करु शकत नाहीत. नलिनी यांनी पुढे लिहिलेय की लोक नेहमीच महागडे कॅफे, ब्राँडेड फोन, अनावश्यक खरेदी आणि सुट्ट्यांवर खर्च करतात. तर काहीजण मोलकरीणी सारखे एक-एक रुपया विचार करुन खर्च करतात. आणि बचत करत रहातात. हळूहळू आपले आयुष्य स्थिर करतात. अनेक युजरने यावर सहमती व्यक्त करत आर्थिक समज केवळ शिक्षणाने येत नाही तर सवयी आणि स्वभाव यावर अवलंबून असते.