Video : आयडियाचा जुगाड! लिलीच्या फुलापासून बनवला नेकलेस, पाहा व्हायरल काकांची कमाल…

| Updated on: Jul 24, 2022 | 10:32 AM

Viral Video : लिलीच्या फुलापासून बनवला नेकलेस, पाहा व्हीडिओ...

Video :  आयडियाचा जुगाड! लिलीच्या फुलापासून बनवला नेकलेस, पाहा व्हायरल काकांची कमाल...
Follow us on

मुंबई : सोशल मीडियावर (Social Media) हटके काही गोष्ट असेल तर त्याची चर्चा होते. त्यातही एखाद्या साध्या गोष्टीपासून काही खास बनवलं तर त्याची जबरदस्त चर्चा होताना पाहायला मिळते. काही कलाकारी सोशल मीडियावर व्हायरल होतात.सध्या असाच एक व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक व्यक्ती वॉटर लिलीपासून (Lily Flower) गळ्यातला हार म्हणजेच नेकलेस बनवताना दिसत आहे. त्याची ही कला पाहून अनेकांना आश्चर्य वाटत आहे. साध्या एका फुलापासून हार बनवण्याची ही कला अनेकांच्या पसंतीला उतरत आहे. लोक त्याच्या कलात्मकतेची आणि त्याच्या या अनोख्या कलेची सध्या जोरदार चर्चा होतेय. हा व्हीडिओ अनेकांनी पाहिला आहे.

व्हायरल व्हीडिओ

एक व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक व्यक्ती वॉटर लिलीपासून गळ्यातला हार म्हणजेच नेकलेस बनवताना दिसत आहे. त्याची ही कला पाहून अनेकांना आश्चर्य वाटत आहे. साध्या एका फुलापासून हार बनवण्याची ही कला अनेकांच्या पसंतीला उतरत आहे. लोक त्याच्या कलात्मकतेची आणि त्याच्या या अनोख्या कलेची सध्या जोरदार चर्चा होतेय. हा व्हीडिओ अनेकांनी पाहिला आहे.

हे सुद्धा वाचा

तलावाच्या काठावर बांधलेल्या लाकडी थांब्यावर ही व्यकीत बसलेली दिसत आहे. त्याच्या हातात लिलीचं फुल आहे. हा व्यक्ती लिलीचं देठ दोन्ही बाजूंनी आळीपाळीने तोडते. तोडत तोडत तो फुलाच्या जवळ येतो. अन् हे फुल गळ्यातल्या हारसारखं दिसायला लागतं. आता तो आपल्या कलात्मकतेचं टोक दाखवतो. तो कळीला आपल्या हाताने फुलवतो. हा पूर्ण नेकलेस इतका सुंदर दिसतोय की लोक त्याची स्तुती करताना थोडंही मागे-पुढे बघत नाहीत.

हा व्हीडिओ श्रीलंकेमधला आहे. आजकाल श्रीलंकेतील आर्थिक स्थिती काय आहे हे सर्वजण जाणून आहेत. आर्थिक मंदी शिगेला पोहोचली आहे आणि लोक रस्त्यावर उतरून आंदोलनं करत आहेत. अश्या वातावरणात हा व्हीडिओ अनेकांच्या चेहऱ्यावर हसू फुलवतोय. सोशल मीडिया यूजर्स या व्हीडिओला खूप पसंती देत आहेत. हा व्हीडिओ अनेकांनी आपल्या सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हीडिओला लाखो लोकांनी पाहिलंय तर साडे तीन लाख लोकांनी याला लाईक केलंय.