AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video | स्टंटबाजी महागात ! मगरीच्या तोंडात हात घातला अन् भलतंच घडलं, थरारक व्हिडीओ व्हायरल

सध्या एक माणूस आणि मगरीचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये माणसाने केलेला आगाऊपणा त्याला चांगलाच भोवलाय. त्याने मगरीच्या तोंडामध्ये हात घालण्याचा प्रयत्न केलाय.

Video | स्टंटबाजी महागात ! मगरीच्या तोंडात हात घातला अन् भलतंच घडलं, थरारक व्हिडीओ व्हायरल
CROCODILE VIRAL VIDEO
| Edited By: | Updated on: Nov 10, 2021 | 9:36 PM
Share

मुंबई : सोशल मीडियावर रोजच अनेक व्हिडीओ व्हायरल होतात. यातील काही व्हिडीओ माणसांच्या करामतीचे असतात. तर काही व्हिडीओंना पाहून आपण आश्चर्यचकित होऊन जातो. काही व्हिडीओ तर अंगाचा थरकाप उडवणारे असतात. सध्या एक माणूस आणि मगरीचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये माणसाने केलेला आगाऊपणा त्याला चांगलाच भोवलाय. त्याने मगरीच्या तोंडामध्ये हात घालण्याचा प्रयत्न केलाय.

माणसाने मगरीच्या तोंडात हात घातला

व्हायरल होत असलेला व्हिडीओ नेमका कुठला आहे, याची माहिती मिळू शकलेली नाही. मात्र हा व्हिडीओ अतिशय थरारक असून यात एक मगर दिसत आहे. स्वीमिंग पुलाच्या बाजूला ही मगर शांतपणे बसली आहे. मगरीजवळ एक माणूसदेखील बसलाय.  तो मगरीच्या तोंडात हात घालून खेळ खेळतोय. एवढ्यावरच तो थांबलेला नाही. मगरीच्या तोंडात घातलेला हात तो आतबाहेर करत आहे.

मगरीने हात जबड्यात पकडला

शेवटी माणसाच्या या कारनाम्यामुळे मगर चांगलीच भडकली आहे. तीने आपल्या जबड्यात माणसाच्या हाताला पकडले आहे. आपला हात मगरीच्या तोंडात फसल्याचे समजताच माणूस चांगलाच घाबरला आहे. नंतर त्याने अथक प्रयत्न करून मगरीपासून स्वत:ची सुटका करुन घेतलीय. विशेष म्हणजे मगरीने हात अतिशय गच्चपणे पकडल्यामुळे माणूस चांगलाच जखमी झालाय.

पाहा व्हिडीओ :

View this post on Instagram

A post shared by طبیعت (@nature27_12)

व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल, नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया 

हा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. व्हिडीओ पाहून नेटकरी वेगवेगळ्या कमेंट्स करत आहेत. काही नेटकऱ्यांनी मगरीच्या तोंडात हात टाण्याचा प्रकार मुर्खपणाचा होता, असं म्हटलंय. तर काही नेटकऱ्यांनी चूक केल्याची त्याला शिक्षा मिळालेली आहे, अशी प्रतिक्रिया दिलीय. हा व्हिडीओ nature27_12 या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पाहाता येईल.

इतर बातम्या :

तब्बल 12 फुटांचा किंग कोब्रा विहिरीत पडला, रेस्क्यू करण्यासाठी वन विभागाने लावली जिवाची बाजी

VIDEO : पीव्ही सिंधूचा ‘Love Nwantinti’ गाण्यावर जबरदस्त डान्स, पाहा व्हिडीओ!

“Mars Edition” tomato ketchup, आता मंगळ ग्रहावरच्या मातीत उगवलेल्या टोमॅटोपासून कॅचअप !

View this post on Instagram

A post shared by طبیعت (@nature27_12)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.