AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“Mars Edition” tomato ketchup, आता मंगळ ग्रहावरच्या मातीत उगवलेल्या टोमॅटोपासून कॅचअप !

मंगळा ग्रहावरच्या (Mars) मातीत उगवलेल्या टोमॅटोपासून कॅचअप तयार करण्यात मानवाला मोठे यश आलं आहे. अमेरिकन फूड कंपनी हेन्झने (Heinz) मंगळ ग्रहासारख्या मातीत पिकवलेल्या टोमॅटोपासून नवीन 'मार्स एडिशन' टोमॅटो केचप तयार केले आहे.

Mars Edition tomato ketchup, आता मंगळ ग्रहावरच्या मातीत उगवलेल्या टोमॅटोपासून कॅचअप !
Mars Edition Tomato ketchup
| Edited By: | Updated on: Nov 09, 2021 | 12:49 AM
Share

मंगळा ग्रहावरच्या (Mars) मातीत उगवलेल्या टोमॅटोपासून कॅचअप तयार करण्यात मानवाला मोठे यश आलं आहे. अमेरिकन फूड कंपनी हेन्झने (Heinz) मंगळ ग्रहासारख्या मातीत पिकवलेल्या टोमॅटोपासून नवीन ‘मार्स एडिशन’ टोमॅटो केचप तयार केले आहे. मानवाने मंगळावर राहण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून हे केले गेले आहे. (Heinz makes Mars Edition tomato ketchup grown in Mars soil)

टोमॅटो पिकवण्यासाठी नवीन तंत्रज्ञानचा शोध

पृथ्वीवरच्या मातीच्या उलट, मंगळाची माती पिकांसाठी कठोर आहे. मंगळ ग्रहावरची माती मार्टियन रेगोलिथ म्हणून ओळखली जाते. त्या मातीत सेंद्रिय पदार्था नसतात. याशिवाय मंगळावर सूर्यप्रकाशही कमी पोहोचतो. यामुळे, टोमॅटो पिकवणाऱ्या टीमने ते वाढवण्यासाठी नवीन तंत्रज्ञान शोधून त्याचा वापर केला आणि त्यांना यश आलं.

मानवाने मंगळावर राहण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून हे केले गेले आहे. एक दिवस माणसानी मंगळावर स्वतः शेती करावी या दिशेने काम करणाऱ्या टीमने मंगळ ग्रहासारखे हरितगृह वातावरण तयार केले आणि मंगळासारखीच माती वापरली. त्यांनी या पद्धतीने टोमॅटो उगवले आणि नंतर हेन्झने त्या टोमॅटोंचे केचअप तयार केले.

‘मार्स एडिशन’ टोमॅटो केचप

हेन्झने तयार केलेल्या ‘मार्स एडिशन’ टोमॅटो केचपची चव साधारण टोमॅटो केचपपेक्षा वेगळी असल्याचे त्यात म्हटले आहे. हेन्झने मार्स व्हर्जन केचपची बाटलीही अंतराळातपण पाठवली होती, जिथे ही बाटली -94 अंश तापमानात होती.

हेन्झमधील टोमॅटो मास्टर्सने मंगळावर भविष्यात जाणारे लोक त्या ग्रहाच्या मातीत टोमॅटो पिकवू शकतील का, त्याचं केचप बनवू शकतील की नाही हे शोधण्यासाठी मोहीम सुरू केली. त्यासाठी उत्तम बियाणे घेण्यात आले आणि जागतिक दर्जाच्या तंत्रज्ञानाचा वापर करून पिकांची वाढ करण्यात आली.

हे टोमॅटो तयार करणाऱ्या टीमचे म्हणणे आहे की, पृथ्वीवरील वातावरणातील बदलामुळे शेती करणे कठीण होत चाललय. अशा प्रकारे पृथ्वीवरही शेती करणं शक्य आहे. नासाचे (NASA) माजी अंतराळवीर माईक मॅसिमिनो म्हणाले की, घरापासून (पृथ्वीपासून) ईतके दूरवर पिकवलेल्याली चव परिचयाची असणे हे मानवाच्या कल्याणासाठी आणि मनोबल वाढवण्यासाठी आवश्यक आहे.

Other News

शेअर बाजारात पैसे गुंतवणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! 25 फेब्रुवारीपासून हा नियम बदलणार

India vs Namibia T20 world cup Result: स्पर्धेचा शेवट गोड, भारताचा नामिबीयावर 9 गडी राखून विजय

गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले...
गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले....
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया.
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती..
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती...
फडणवीसांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले..
फडणवीसांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले...
'धुरंधर'वरून शिंदे-ठाकरेंमध्ये जुंपली, रहमान डकैतवरून तुफान टोलेबाजी
'धुरंधर'वरून शिंदे-ठाकरेंमध्ये जुंपली, रहमान डकैतवरून तुफान टोलेबाजी.
फेकनाथ मिंधे...आदित्य ठाकरे यांची टोलेबाजी, एकनाथ शिंदे यांना डिवचलं!
फेकनाथ मिंधे...आदित्य ठाकरे यांची टोलेबाजी, एकनाथ शिंदे यांना डिवचलं!.
राज्यात 29 महापालिका निवडणुकांचं बिगुलं वाजलं,आजपासून आचारसंहिता लागू
राज्यात 29 महापालिका निवडणुकांचं बिगुलं वाजलं,आजपासून आचारसंहिता लागू.
मुंबई, ठाणे ते पुणे... महापालिकेची निवडणूक अन् निकाल कधी? तारखा जाहीर
मुंबई, ठाणे ते पुणे... महापालिकेची निवडणूक अन् निकाल कधी? तारखा जाहीर.
मनसेचा निवडणूक आयोगाच्या कार्यालयात राडा, कम्प्युटर तोडले अन्... नेमकं
मनसेचा निवडणूक आयोगाच्या कार्यालयात राडा, कम्प्युटर तोडले अन्... नेमकं.
कोचिंग क्लासमध्ये भोसकला चाकू अन्... 10वीच्या मुलाकडून मित्राची हत्या
कोचिंग क्लासमध्ये भोसकला चाकू अन्... 10वीच्या मुलाकडून मित्राची हत्या.