VIDEO : लळा लागला… मांजरीचं पिल्लू मालकिनीला घराबाहेर पडू देईना, नेटकरी म्हणतात, क्यूट व्हिडीओ!

सोशल मीडियावर नेहमीच प्राण्यांचे व्हिडिओ व्हायरल होत असतात. असाच एक मांजरीच्या पिल्लाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घातलाना दिसत आहे. हा व्हिडीओ अनेकांना आवडला आहे. या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, घरातील एक महिला कुठेतरी बाहेर जाण्यास निघाली आहे.

VIDEO : लळा लागला... मांजरीचं पिल्लू मालकिनीला घराबाहेर पडू देईना, नेटकरी म्हणतात, क्यूट व्हिडीओ!
व्हायरल व्हिडीओ

मुंबई : सोशल मीडियावर नेहमीच प्राण्यांचे व्हिडिओ व्हायरल होत असतात. असाच एक मांजरीच्या पिल्लाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घातलाना दिसत आहे. हा व्हिडीओ अनेकांना आवडला आहे. या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, घरातील एक महिला कुठेतरी बाहेर जाण्यास निघाली आहे. मात्र, मांजरीचे पिल्लू तिला बाहेर जाऊ देत नाही आणि तिच्या पायावर बसते.

व्हिडिओमधील हे मांजराचे पिल्लू खूपच लहान आणि गोंडस दिसत आहे. या व्हिडीओमध्ये एक महिला आपल्या घराच्या दारात उभी असून तिला घराबाहेर पडता येत नसल्याचे या व्हिडिओमध्ये दिसत आहे. हा व्हिडीओ सर्वांनाच खूप आवडला आहे. हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर शेअर देखील केला जात आहे.

View this post on Instagram

A post shared by Cat Lovers (@cats_yye)

व्हिडिओ पाहून अंदाज लावला जाऊ शकतो की या मांजरीचे पिल्लू या महिलेवर जितके प्रेम करते. तितकेच ही महिला देखील मांजरीच्या पिल्लावर प्रेम करते. व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे. तुम्ही सर्वजण @cats_yye च्या पेजवर हा व्हिडिओ पाहू शकता.

या व्हिडिओला आतापर्यंत हजारो लाईक्स आणि कमेंट्स मिळाल्या आहेत. या व्हिडिओला आतापर्यंत 16 हजारांहून अधिक लाइक्स मिळाले आहेत. या व्हिडिओवर एका यूजर्सने लिहिले की, ‘हे मांजरीचे पिल्लू खूप गोंडस आहे’ तर दुसर्‍या यूजरने लिहिले, मला वाटते की हे मांजरीचे पिल्लू त्याच्या मालकिनवर खूप प्रेम करते.

संबंधित बातम्या : 

Viral | जेव्हा अस्वल रस्त्याच्या कडेला पोल डान्स करतो, व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणतात एक नंबर डान्स

विमानातून 16 हजार फुटांवरुन उडी, तितक्यात विमानाचं नियंत्रण सुटलं आणि त्यानंतर…

प्रेम म्हणजे काय असतं? चिमुरडीचं पत्रातून भन्नाट उत्तर, हर्ष गोयंकांकडून पत्र ट्विट!

(Cute video of a kitten goes viral on social media)

Published On - 9:28 am, Mon, 8 November 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI