प्रेम म्हणजे काय असतं? चिमुरडीचं पत्रातून भन्नाट उत्तर, हर्ष गोयंकांकडून पत्र ट्विट!

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: |

Updated on: Nov 06, 2021 | 4:39 PM

आपल्या नुकत्याच केलेल्या ट्विटमध्ये उद्योगपती हर्ष गोयंका यांनी 'प्रेमा'च्या व्याख्येबाबत एका 6 वर्षांच्या मुलीचे उत्तर शेअर केले आहे. प्रेम म्हणजे काय… या प्रश्नावर मुलीने दिलेले उत्तर खूपच मजेशीर आहे.

प्रेम म्हणजे काय असतं? चिमुरडीचं पत्रातून भन्नाट उत्तर, हर्ष गोयंकांकडून पत्र ट्विट!
लहान मुलीचं पत्र

RPG ग्रुपचे चेअरमन हर्ष गोयंका पुन्हा एकदा त्यांच्या ट्विटमुळे चर्चेत आले आहेत. यावेळी त्यांनी ‘प्रेम म्हणजे काय’ याविषयीची एक पोस्ट शेअर केली आहे, जी पाहता पाहता व्हायरल झाली आहे. उद्योगपती हर्ष गोयंका सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. जेव्हा ते एखादी मजेदार पोस्ट शेअर करतो तेव्हा ती लगेच व्हायरल होते. त्यांचे फॉलोअर्सही मजेशीर पद्धतीने त्यांच्या प्रतिक्रिया नोंदवतात. यामुळेच गोएंका यांच्या प्रत्येक पोस्टला लोक पसंत करतात. (Harsh Goenka Tweet a latter What is Love Harsh Goenka Latest tweet goes viral on Social Media netizens reacts)

आपल्या नुकत्याच केलेल्या ट्विटमध्ये उद्योगपती हर्ष गोयंका यांनी ‘प्रेमा’च्या व्याख्येबाबत एका 6 वर्षांच्या मुलीचे उत्तर शेअर केले आहे. प्रेम म्हणजे काय… या प्रश्नावर मुलीने दिलेले उत्तर खूपच मजेशीर आहे. काहींना हे मजेदार वाटले, तर काहींनी ही वस्तुस्थिती असल्याचे म्हटले. मुलीने उत्तरात लिहिले, “प्रेम म्हणजे जेव्हा तुमचे काही दात पडतात, तरीही तुम्ही हसायला घाबरत नाही. कारण तुम्हाला चांगलंच माहीत असतं की, तुमचे काही दात नसले तरी तुमचे मित्र तुमच्यावर प्रेमाचा वर्षाव करतील.”

पाहा पत्र:

एका यूजरने कमेंट करताना लिहिले, ‘मुलीच्या वयानुसार तिचे उत्तर खूपच मजेदार वाटले, परंतु तिच्या प्रेमाची व्याख्या कौतुकास्पद आहे. मुलं वयात ते जे काही बोलतात ते देवाचे शब्द असतात.”

याआधी हर्ष गोयंकांनी ‘टोस्ट भेळपुरी रेसिपी’ची रेसिपी शेअर केली होती, जी लोकांना खूप आवडली होती. पेटीएमचे सीईओ विजय शेखर शर्मा देखील त्यांच्या पोस्टवर कमेंट करण्यापासून स्वतःला रोखू शकले नाहीत. हर्ष गोएंका आपल्या फॉलोअर्ससाठी अनेकदा मजेदार व्हिडिओ आणि पोस्ट शेअर करत असतो.

हेही पाहा:

Video: मोड आलेल्या कडधान्यापासून बनवलेली अनोखी चाट, कानपूरचे चाटवाले आजोबांचा व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल

Video: हातात जाएंट कोब्रा घेऊन डान्स, व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, हा हाताने जीव द्यायला निघालाय!

 

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI