ब्रेडच्या तुकड्यांवर आंब्याचा रस आणि आयस्क्रिम, वडोदऱ्याच्या रेसिपीला खाद्यप्रेमी शिव्या का घालत आहेत?

कधीकधी काही लोक खाद्यपदार्थांवर असे काही प्रयोग करतात, की ते पाहून खाद्यप्रेमीचा पारा चढेल.सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे

ब्रेडच्या तुकड्यांवर आंब्याचा रस आणि आयस्क्रिम, वडोदऱ्याच्या रेसिपीला खाद्यप्रेमी शिव्या का घालत आहेत?
वडोदऱ्याची मँगो डॉली आयक्रिम
| Edited By: | Updated on: Sep 20, 2021 | 12:27 PM

वडोदरा: जगातील प्रत्येकाला चांगलं आणि चमचमीत खायला आवडतं. म्हणूनच खाण्याचं नाव ऐकताच अनेकांच्या तोंडाला पाणी सुटतं. ज्यांना खाण्याची आवड आहे ते खाण्याच्या बाबतीत अनेक प्रयोग करतात. पण कधीकधी काही लोक खाद्यपदार्थांवर असे काही प्रयोग करतात, की ते पाहून खाद्यप्रेमीचा पारा चढेल.सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ( Mango Dolly ice cream made from bread, mango ice cream and chutney. Vadodara’s unique recipe goes viral )

हा व्हिडीओ गुजरातच्या वडोदऱ्याचा आहे. इथं एक ठेलेवाला ‘मॅंगो डॉली आइस्क्रीम चाट’ बनवताना दिसतो आहे. 3 मिनिटांच्या या व्हिडिओमध्ये, हा ठेलेवाला आधी ब्रेडचा साखरेच्या पाकात भिजवलेले तुकडे ठेवतो, त्यावर नारळाचं पाणी टाकतो. मग त्या ब्रेडवर वेगवेगळे सॉस, ड्राय फ्रूट्स आणि शेवटी मॅंगो आइस्क्रीम ठेवतो, पुन्हा ब्रेडचे लहान लहान तुकडे टाकतो.

या व्हिडिओमध्ये आधी हा व्यक्ती चाटमध्ये आंब्याचा रसही टाकतो . यानंतर, आइस्क्रीमचे छोटे तुकडे पुन्हा कापले जाताात, तयार झाली, ‘मॅंगो डॉली आइस्क्रीम चाट’,. हा व्हिडिओ काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर शेअर करण्यात आला होता. ज्याला आतापर्यंत लाखो वेळा पाहिलं गेले आहे. खरं तर, प्रत्येकाची स्वतःची वेगळी आवड असते. पण ही रेसिपी सोशल मीडियावर व्हायरल होताच काही लोक ती बनवणाऱ्या व्यक्तीला शिव्या देत आहेत.

पाहा व्हिडीओ:

ही विचित्र रेसिपी पाहून लोक खूप चिडलेले दिसत आहेत. जरी असे बरेच लोक आहेत जे असे म्हणत आहेत की, त्यांनी ही नवीन रेसिपी ट्राय केली पाहिजे. मिल्कशेक मॅगीचा व्हिडीओसुद्धा काही दिवसांपूर्वी व्हायरल झाला होता, त्यावरही लोकांनी खूप शिव्या घातल्या होत्या. त्यानंतर या व्हिडीओवर खाद्यप्रेमी चिडलेले पाहायला मिळत आहेत.