International Women’s Day 2021 | महिला दिनाचा उत्साह, सर्वपक्षीय नेत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव

| Updated on: Mar 08, 2021 | 10:40 AM

अनेक राजकीय नेत्यांनी 'आंतरराष्ट्रीय महिला दिना'च्या शुभेच्छा दिल्या आहेत. (Many Political leaders wish International Women’s Day 2021)

International Women’s Day 2021 | महिला दिनाचा उत्साह, सर्वपक्षीय नेत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव
Follow us on

मुंबई : जगभरात 8 मार्च हा दिवस जागतिक महिला दिन (International Women’s Day 2021) म्हणून साजरा केला जातो. या पार्श्वभूमीवर जगभरात आज विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.  या निमित्ताने अनेक राजकीय नेत्यांनी ‘आंतरराष्ट्रीय महिला दिना’च्या शुभेच्छा दिल्या आहेत. (Many Political leaders wish International Women’s Day 2021)

मुख्यमंत्र्यांकडून महिला दिनाच्या शुभेच्छा

मुख्यमंत्री शुभेच्छा संदेशात म्हणतात, हा दिन महिलांप्रती ऋण व्यक्त करण्याचा, किंवा कर्तव्याचा भाग म्हणून नाही. तर आपण जे काही आहोत, त्या आयुष्यातील प्रत्येक टप्प्यात आयुष्यात धैर्याने साथ सोबत करणाऱ्या शक्तीला वंदन करण्याचा दिन आहे. महाराष्ट्राला शूर, कर्तबगार, समाजसुधारक, विचारवंत महिलांची मोठी परंपरा आहे. त्यामध्ये माँसाहेब जिजाऊ महाराज, पुण्यश्लोक अहिल्यादेवी, ताराराणी, क्रांतीज्योती सावित्रीबाई यांच्यासह अनेकांचा उल्लेख करावा लागेल. त्यांच्याप्रती ऋण व्यक्त करावे लागेल, त्यांना या निमित्ताने वंदन करावे लागेल. पण त्यांचा वारसा चालवणाऱ्या आताच्या काळातील महिलांनाही वंदन करावे लागेल.

विशेषतः गेले वर्षभर कोरोना विरोधातील लढा सुरु आहे. तो अजूनही संपलेला नाही. या लढ्यात घरा-घरात महिलांनी न डगमगता, सगळ्यांना आधार दिला. कोविड योद्धा म्हणूनही आशा सेविका, परिचारिका अशा विविध जबाबदाऱ्या धैर्याने पार पाडल्या. त्यांचे हे योगदान इतिहास विसरू शकणार नाही. अशा कठीण काळात धैर्याने जबाबदारी घेणाऱ्या स्त्रीशक्ती, मातृ शक्तीला जपणे, त्यांना सुरक्षित ठेवणे आपले कर्तव्य आहे. महाराष्ट्र सुरक्षित आहेच, पण आणखी सुरक्षित वातावरण निर्माण करण्याची शपथ घेऊ या. महिलांच्या दृष्टीकोनातून विविध क्षेत्रात सुधारणा करण्यासाठी वचनबद्ध होऊ या, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.

अजित पवारांकडून सर्व स्त्रीशक्तीला वंदन 

तर अजित पवार यांनी ‘आंतरराष्ट्रीय महिला दिना’निमित्त समस्त स्त्रीशक्तीला वंदन करत राज्यातील माता-भगिनी आणि बंधूंनाही ‘आंतरराष्ट्रीय महिला दिना’च्या शुभेच्छा दिल्या आहेत.

महाराष्ट्राच्या मातीला राजमाता जिजाऊ माँसाहेबांच्या विचारांचा, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या कर्तृत्वाचा, राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या नेतृत्वाचा वारसा लाभला आहे. हा वारसा पुढे नेण्याचं काम आपण सर्वजण करत आहोत. महाराष्ट्रातील स्त्रीशक्ती हा वारसा अधिक समर्थपणे, यशस्वीपणे पुढे नेत आहे याचा आपल्या सर्वांना आनंद, अभिमान आहे.

महाराष्ट्राच्या गाव-खेड्यात राहणाऱ्या, शेतामध्ये कष्ट करणाऱ्या, शहरांमध्ये नोकरी, उद्योग, व्यवसाय करून कुटुंबाला हातभार लावणाऱ्या समस्त माता-भगिनींच्या त्यागाचे स्मरण करून, राष्ट्रनिर्मितीतील स्त्रीशक्तीच्या योगदानाबद्दल उपमुख्यमंत्र्यांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे. महाराष्ट्रातील स्त्रीशक्तीला त्यांचा हक्क, मान-सन्मान, सुरक्षित वातावरण देण्याचा आपण सर्वांनी निर्धार करूया, असे आवाहनही उपमुख्यमंत्र्यांनी केले आहे.

(Many Political leaders wish International Women’s Day 2021)

संबंधित बातम्या :

International Women’s Day 2021 | जगभरात महिला दिनाचा उत्साह, महापौर बंगल्याला गुलाबी रंगाची रोषणाई

International Women’s Day 2021 : 112 वर्षांपूर्वी एका आंदोलनापासून प्रारंभ, महिला दिन कसा सुरु झाला?