International Women’s Day 2021 : 112 वर्षांपूर्वी एका आंदोलनापासून प्रारंभ, महिला दिन कसा सुरु झाला?

आज जागतिक महिला दिन (International Women's Day) दरवर्षी 8 मार्च रोजी साजरा केला जातो.

International Women's Day 2021 : 112 वर्षांपूर्वी एका आंदोलनापासून प्रारंभ, महिला दिन कसा सुरु झाला?

मुंबई : आज जागतिक महिला दिन (International Women’s Day) दरवर्षी 8 मार्च रोजी साजरा केला जातो. आपल्या घरापासून ते देशाच्या विकासामध्येही महिलांचे मोठे योगदान आहे. या दिवशी प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने महिलांप्रति आदर व्यक्त करतो. यानिमित्ताने वेगवेगळ्या कार्यक्रमांचंही आयोजन केले जाते. चला पाहूया 8 मार्च या दिवशी महिला दिन साजरा का केला जातो. (International women’s day history)

सर्वात पहिला जागतिक महिला दिन साजरा करण्याची सुरवात 28 फेब्रुवारी 1909 रोजी करण्यात आला. महिला दिनानिमित्त संयुक्त राष्ट्र संघात एक थीम तयार करण्यात आली होती. जागतिक महिला दिनाची पहिली थीम सेलिब्रेटिंग द पास्ट, प्लानिंग फॉर द फ्युचर ठेवली होती. विशेष म्हणजे प्रत्येकवर्षी जागतिक महिला दिवस साजरा करताना एक विशेष थीम बनवण्यात येते. यावर्षी “Women in leadership: an equal future in a COVID-19 world” कोरोनाच्या पार्श्वभूमीवर थीम तयार करण्यात आली आहे.

आज महिला स्वत:ला चांगल्या प्रकारे व्यक्त करु शकतात. मात्र पहिले असे नव्हते. पूर्वीच्या महिलांना ना शिक्षण, ना नोकरी आणि मतदान करण्याचा अधिकार होता. मात्र 1908 मध्ये 15 हजार महिलांनी न्यूयॉर्कमध्ये रस्त्यावर उतरत एक मोर्चा काढला होता. मतदानाचा अधिकार, कमी तासाची नोकरी आणि चांगल्या पगाराची नोकरी मिळावी या तीन प्रमुख गोष्टींच्या मागण्यांसह हा मोर्चा काढण्यात आला होता.

1909 मध्ये अमेरिकेत सोशलिस्ट पार्टीने एक घोषणा केली आणि युनायटेड स्टेटमध्ये पहिला जागतिक महिला दिन 28 फेब्रुवारी रोजी साजरा करण्यात आला होता. यानंतर सन 1910 च्या आंतरराष्ट्रीय महिला परिषेदत मांडलेल्या सुचनेनुसार, 8 मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून निश्चित करण्यात आला. तसेच 19 मार्चला पहिल्यांदा ऑस्ट्रिया डेन्मार्क आणि स्वित्झरलँडमध्येही जागतिक महिला दिवस साजर केला.

दोन वर्षानंतर 1913 मध्ये जागतिक महिला दिनाची तारीख बदलून 8 मार्च करण्यात आली आणि तेव्हापासून आजचा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो. जागतिक महिला दिन सन्मान देण्यासाठी महिला सशक्तीकरण आणि मुला-मुलींमधील भेदभाव दूर करण्याच्या उद्देशाने साजरा केला जातो. दरम्यान 2017 मध्ये एका सर्व्हेनुसार एक धक्कादायक अशी गोष्ट समोर आली आहे. सर्व्हेच्या माहितीनुसार महिला-पुरुषांमधील असमानता संपण्यासाठी अजून 100 वर्ष लागण्याची शक्यता वर्तवली आहे. भारतात मुंबई येथे पहिला महिला दिन हा 8 मार्च 1943 ला साजरा झाला.

संबंधित बातम्या : 

‘अन्यायग्रस्त महिलांची मैत्रीण’ ते ‘शिवसेनेची रणरागिणी’, कोण आहेत नीलम गोऱ्हे?; वाचा सविस्तर

(International women’s day history)

Published On - 9:42 am, Mon, 8 March 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI