Anand Mahindra Tweet: खड्ड्यामध्ये भारताचा नकाशा, आनंद महिंद्रांचं व्हायरल ट्विट! सोशल मीडियावर भरभरून कमेंट्स

| Updated on: Aug 05, 2022 | 4:08 PM

हा फोटो 3 ऑगस्ट रोजी एका ट्विटर युझरने शेअर केला होता आणि लिहिले होते- भारतात रस्त्यावरील खड्ड्यांची एकच समस्या आहे की त्यांचा आकार एखाद्या छोट्या देशासारखा आहे!! आनंद महिंद्रा यांनी हेच ट्विट पुन्हा ट्विट करत कमेंट म्हणून केवळ एक धक्कादायक इमोजी शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

Anand Mahindra Tweet: खड्ड्यामध्ये भारताचा नकाशा, आनंद महिंद्रांचं व्हायरल ट्विट! सोशल मीडियावर भरभरून कमेंट्स
Anand Mahindra Viral Tweet
Image Credit source: सोशल मीडिया
Follow us on

उद्योगपती आनंद महिंद्रा (Anand Mahindra) यांचे इंटरनेटवरील ट्विट व्हायरल (Viral Tweet) व्हायला वेळ लागत नाही. गेल्या काही दिवसांपासून महिंद्रा यांचे बॅक टू बॅक ट्विट लोकांमध्ये चर्चेचा विषय ठरत आहेत. आता त्याने व्हायरल फोटो शेअर करत आपली प्रतिक्रिया दिली आहे. खरं तर हा तोच फोटो आहे जो तुम्ही व्हॉट्सॲपवरून इतर सोशल मीडियावर (Social Media) पाहिला असेल किंवा शेअर केला असेल! या फोटोमध्ये ‘इंडिया’चा नकाशा दिसत आहे. परंतु प्रत्यक्षात हा एक खड्डा आहे जो पावसानंतर पाण्याने भरला गेला आहे.

व्हायरल फोटोवर महिंद्राची प्रतिक्रिया

हा फोटो 3 ऑगस्ट रोजी एका ट्विटर युझरने शेअर केला होता आणि लिहिले होते- भारतात रस्त्यावरील खड्ड्यांची एकच समस्या आहे की त्यांचा आकार एखाद्या छोट्या देशासारखा आहे!! आनंद महिंद्रा यांनी हेच ट्विट पुन्हा ट्विट करत कमेंट म्हणून केवळ एक धक्कादायक इमोजी शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. या ट्विटला आतापर्यंत 3500 हून अधिक लाईक्स आणि 200 हून अधिक रिट्वीट मिळाले आहेत. त्याचबरोबर युजर्स यावर प्रतिक्रिया देत आहेत. एका व्यक्तीने लिहिले – भारत आमच्या कणा कणांमध्ये आहे, तर दुसऱ्या वापरकर्त्याने लिहिले की सर मुंबईत आपल्याला अशा प्रकारचे सर्व नकाशे सापडतील.

‘अमेरिकन रोड पॅच’

रस्त्यावरील खड्डे आणि भेगा दुरुस्त करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या ‘अमेरिकन रोड पॅच’ या उत्पादनाची व्हिडिओ क्लिप आनंद महिंद्रा यांनी बुधवारी ट्विट केली. कॅप्शनमध्ये महिंद्राने लिहिले- “मला असे म्हणायचे आहे की, हा एक असा अविष्कार आहे जो भारतासाठी आवश्यक आहे. इमारत / बांधकाम सामग्री आणि उत्पादक कंपन्यांनी असं काहीतरी बनवणं किंवा या अशा कंपन्यांसोबत भागीदारी करणं अत्यंत महत्त्वाचं आहे.