AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video | तरुण विनामास्कचा रेल्वेमध्ये चढला, महिलांनी शिकवला चांगलाच धडा, व्हिडीओ एकदा पाहाच

सध्या नियमांची पायमल्ली करणाऱ्या अशाच एका तरुणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Video | तरुण विनामास्कचा रेल्वेमध्ये चढला, महिलांनी शिकवला चांगलाच धडा, व्हिडीओ एकदा पाहाच
TRAIN YOUNG BOY MASK VIRAL VIDEO
| Edited By: | Updated on: Jul 19, 2021 | 4:24 PM
Share

मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव असल्यामुळे जगात खबरदारी घेतली जात आहे. कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणूम मास्क लावणे तसेच सोशल डिस्टन्सिंग पाळण्याचे आवाहन केले जात आहे. मात्र, आपल्या भोवती असे काही लोक असतात, ज्यांना कितीही सांगितलं तरी ते कोरोना नियम पाळायला तयार नसतात. सध्या नियमांची पायमल्ली करणाऱ्या अशाच एका तरुणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये मास्क न लावणाऱ्या तरुणाला महिलांनी चांगलाच धडा शिकवला आहे. (maskless man pushed off a train by women video went viral on social media)

प्रवासादरम्यान तरुणाने मास्क लावला नाही

मिळालेल्या माहितीनुसार हा व्हिडीओ स्पेनमधील आहे. स्पेनमध्येही कारोना रुग्णांची संख्या बरीच असल्यामुळे खबरदारी म्हणून येथील नागरिक मास्क लावत आहेत. सार्वजनिक ठिकाणी तसेच प्रवासादरम्यान येथे प्रत्येक नागरिकाच्या चेहऱ्यावर मास्क आहे. पण सध्या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये जो तरुण दिसतो आहे, त्याने मास्क लावलेला दिसत नाहीये.

महिलांनी तरुणाला चांगला धडा शिकवला

याच कारणामुळे ट्रेनमध्ये मास्क न लावता चढल्यानंतर महिलांनी तरुणाला चांगला धडा शिकवला आहे. महिलांनी चेहऱ्यावर मास्क नसलेल्या या तरुणाला रेल्वेतून खाली उतवलं आहे. दोन महिलांनी तर त्याच्यासमोर येत त्याला धक्के देत रेल्वेतून हाकललं आहे. या घटनेचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.

ट्रेनमधून उतरण्यास तरुणाचा नकार

या व्हिडीओमध्ये सुरुवातीला एक तरुण ट्रेनमध्ये चढल्याचे दिसतेय. ट्रेनमध्ये चढताना त्याने चेहऱ्याला मास्क लावलेले नाही. याच कारणामुळे रेल्वेमधील महिला या तरुणावर खवळल्या आहेत. त्यानंतर या महिलांनी तरुणाला धक्के मारत रेल्वेच्या बाहेर काढले आहे. रेल्वेमधून बाहेर जाण्यासाठी तो नकार देताना आपल्याला व्हिडीओमध्ये दिसतंय. पण रेल्वेतील महिला या त्याला दाद देत नसून त्यांनी त्याला थेट रेल्वेच्या बाहेर ढकलून दिलं आहे. रेल्वेच्या बाहेर हाकलल्यानंतर हा तरुण आपले सामान घेऊन प्लॅटफॉर्मवर बसल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. हा तरुण थोडासा रागवल्याचेसुद्धा आपल्याला दिसतेय.

पाहा व्हिडीओ :

व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

दरम्यान हा व्हिडीओ स्पेनमधील असला तरी नेमके ठिकाण समजू शकलेले नाही. लोक हा व्हिडीओ पाहून मजेदार कमेंट्स करत आहेत. सध्या हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

इतर बातम्या :

VIDEO: महिलेच्या अंगावर बसलेल्या पोलिसाचा फोटो व्हायरल, अखिलेश यादवांकडून हल्लाबोल

Video | ‘लेडी बाहुबली’ची न्यारी तऱ्हा, पाठीवर सिलिंडर ठेवत व्यायाम, व्हिडीओ व्हायरल

Video | गळ्यात वरमाला टाकताना नवरदेवाने केली नवरीची थट्टा, पुढे काय झालं ?

(maskless man pushed off a train by women video went viral on social media)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.