Video | ‘लेडी बाहुबली’ची न्यारी तऱ्हा, पाठीवर सिलिंडर ठेवत व्यायाम, व्हिडीओ व्हायरल

सोशल मीडियावर या धष्टपुष्ट तरुण-तरुणींचा बोलबाला असतो. सध्या अशाच एका लेडी बाहुबलीचा व्हिडीओ चर्चेत आला आहे. या महिलने केलेला व्यायाम पाहून सगळेच अवाक् झाले आहेत.

Video | 'लेडी बाहुबली'ची न्यारी तऱ्हा, पाठीवर सिलिंडर ठेवत व्यायाम, व्हिडीओ व्हायरल
women exercise viral video

मुंबई : प्रत्येकालाच आपलं शरीर हे सुदृढ आणि निरोगी असावं असं वाटतं. याच कारणामुळे आजकालचे तरुण-तरुणी जीममध्ये जातात. तसेच वेगवेगळ्या प्रकारचे कठिणातले कठीण व्यायमसुद्धा ते करतात. सोशल मीडियावर या धष्टपुष्ट तरुण-तरुणींचा बोलबाला असतो. सध्या अशाच एका लेडी बाहुबलीचा व्हिडीओ चर्चेत आला आहे. या महिलने केलेला व्यायाम पाहून सगळेच अवाक् झाले आहेत. (young women doing exercise by keeping gas cylinder and boy on her back video went viral on social media)

महिलेने स्वत:च्या पाठीवर गॅस सिलिंडर ठेवला

सध्या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये एक महिला दिसत आहेत. ही महिला अतिशय फीट दिसत असून तिच्या चेहऱ्यावर एक वेगळ्याच प्रकारची चमक आहे. या महिलने व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमध्ये जे केलं आहे, ते थक्क करुण सोडणारं आहे. या व्हिडीओमध्ये महिलेने आपल्या पाठीवर एक गॅस सिलिंडर ठेवल्याचं दिसतंय. तसेच या सिलिंडरसोबत महिलेने एका मुलालासुद्धा तिच्या पाठीवर उभं केलं आहे. एवढं सारं वजन पाठीवर घेऊन ही महिला पुल अप्स काढण्याच्या स्थितीमध्ये थांबली आहे.

मुलाला पाठीवर घेण्याचे धाडस वाखाणण्याजोगे

महिलेचे हे धाडस पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. अनेकांनी या महिलेला लेडी बाहुबली म्हटलं आहे. तर काही नेटकऱ्यांनी या महिलेची प्रशंसा करत तिचे अभिनंदन केले आहे. एका गॅस सिलिंडरसोबत मुलाला पाठीवर घेण्याचे तिचे धाडस वाखाणण्याजोगे आहे. याच कारणामुळे हा व्हिडीओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. तसेच या व्हिडीओला पाहून नेटकरी भरभरुन प्रतिक्रिया देत आहेत.

पाहा व्हिडीओ :

व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

सध्या व्हायरल होणारा हा व्हिडीओ shaili_chikara या इन्टाग्राम अकाऊंटवर अपलोड करण्यात आला असून या व्हिडीओला हजारो लोकांनी लाईक केले आहे. सध्या या व्हिडीओला मोठ्या प्रमाणात शेअरसुद्धा केले जात आहे.

इतर बातम्या :

Video | गळ्यात वरमाला टाकताना नवरदेवाने केली नवरीची थट्टा, पुढे काय झालं ?

Video | खाली पाणी, वर निमुळता पूल, मुलांची थरारक सायकलिंग सोशल मीडियावर व्हायरल

Vdieo | उंच उड्या मारत हवेत डान्स, आजोबांच्या थिरकण्याने कार्यक्रमात रंगत, व्हिडीओ पाहाच

(young women doing exercise by keeping gas cylinder and boy on her back video went viral on social media)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI