AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video | गळ्यात वरमाला टाकताना नवरदेवाने केली नवरीची थट्टा, पुढे काय झालं ?

सध्या व्हायरल होणारा व्हिडीओ हा एका लग्न समारंभातील आहे. या व्हिडीओमध्ये नवरदेवाने नवरीची चांगलीच थट्टा केली आहे. नवरी आणि नवरदेवांमधील हा खेळ नेटकऱ्यांना चांगलाच आवडला आहे.

Video | गळ्यात वरमाला टाकताना नवरदेवाने केली नवरीची थट्टा, पुढे काय झालं ?
bride and groom viral video
| Edited By: | Updated on: Jul 18, 2021 | 4:03 PM
Share

मुंबई : सोशल मीडियावर रोजच वेगवेगळे व्हिडीओ अपलोड केले जातात. यातील काही व्हिडओ हे चांगलेच मजेदार असतात. प्राणी, पक्ष्यांच्या व्हिडीओंसोबतच लोकांच्या विविध करामती या व्हिडीओत दाखवण्यात आलेल्या असतात. याच कारणामुळे या व्हिडीओंची दिवसभर चर्चा होत असते. सध्या व्हायरल होणारा व्हिडीओ हा एका लग्न समारंभातील आहे. या व्हिडीओमध्ये नवरदेवाने नवरीची चांगलीच थट्टा केली आहे. नवरी आणि नवरदेवांमधील हा खेळ नेटकऱ्यांना चांगलाच आवडला आहे. (groom playing with bride while marriage varmala program video went viral on social media)

व्हिडीओमध्ये काय आहे ?

सध्या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये नवरदेव आणि नवरी दिसत आहेत. हा व्हिडीओ लग्नसमारंभातील असल्यामुळे येथे बऱ्याच लोकांनी गर्दी केली आहे. या गर्दीमध्ये लग्नसोहळा पार पडतोय. यावेळी नवरी-नवरदेव एकमेकांच्या गळ्यात वरमाला टाकताना येथे चांगलीच धम्माल उडाली आहे. नवरदेवाने नवरीसोबत थट्टा, मस्करी केली आहे.

नवरीला नवरदेवाच्या गळ्यात वरमाला टाकता येत नाहीये

या व्हिडीओमध्ये नवरी नवरदेवाच्या गळ्यात वरमाला टाकत आहे. मात्र, नवरदेव नवरीला ही वरमाला त्याच्या गळ्यात टाकू देत नाहीये. नवरी वरमाला घेऊन पुढे येताच. नवरदेव नवरीपासून लांब होतोय. परिणामी नवरीला नवरदेवाच्या गळ्यात वरमाला टाकता येत नाहीये. हा प्रसंग पाहून लोक चांगलेच हसत आहेत. नवरीने दोन ते तीन वेळा नवरदेवाच्या गळ्यात वरमाला टाकण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, काहीही झालं तरी नवरदेव तिला ते करु देत नाहीये.

शेवटी नवरी सोफ्यावर थकून बसली

शेवटी नवरी सोफ्यावर थकून बसलेली आपल्याला या व्हिडीओमध्ये दिसतेय. पुढे नवरदेसुद्धा तिच्या बाजूला बसल्यानंतर नवरीने योग्य वेळ साधत नवरदेवाच्या गळ्यात वरमाला टाकली आहे. नवरी अखेर यशस्वी झाल्यामुळे सगळीकडे हशा पिकला आहे. हा सारा प्रसंग कॅमेऱ्यात कैद करण्यात आला आहे.

पाहा व्हिडीओ :

व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

दरम्यान, हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनाही चांगलाच आनंद झाला आहे. नेटकरी या व्हिडीओला मोठ्या प्रमाणात शेअर करत असून त्याला लाईकसुद्धा करत आहेत. नवरीसोबत नवरदेवाने खेळलेला हा खेळ नेटकऱ्यांच्या पसंदीस उतरला असून या व्हिडीओवर अनेकांनी उत्स्फूर्तपणे प्रतिक्रिया दिल्या आहेत. हा व्हिडीओ कुठला आहे ? याबाबत नेमकी माहिती मिळू शकलेली नाही. मात्र, या व्हिडीओला ‘Dulhaniyaa’ नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर करण्यात आले आहे.

इतर बातम्या :

Video | खाली पाणी, वर निमुळता पूल, मुलांची थरारक सायकलिंग सोशल मीडियावर व्हायरल

Vdieo | उंच उड्या मारत हवेत डान्स, आजोबांच्या थिरकण्याने कार्यक्रमात रंगत, व्हिडीओ पाहाच

Video | दोन लहान मुलांची जुंपली, लाथाबुक्क्यांनी एकमेकांना मारहाण, बघ्यांची गर्दी, मजेदार व्हिडीओ एकदा पाहाच

(groom playing with bride while marriage varmala program video went viral on social media)

चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...