
सोशल मीडियावर नेहमी वेगवेगळे व्हिडिओ व्हायरल होत असतात, यातील काही व्हिडिओ हे मनाला लाजवणारे असतात. काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशातून एक व्हिडिओ समोर आला होता. यात पूर्वांचल एक्सप्रेसवेवर एका नवविवाहित जोडप्याच्या अश्लील हरकती कॅमेऱ्यात कैद झाल्या होत्या. हे जोडपे टोल प्लाझाजवळ कार थांबवून अश्लील वर्तन करत होते. हा व्हिडिओ एक्सप्रेसवेवर बसवलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये कैद झाला होता. हा व्हिडिओ एका ATSM ने तो रेकॉर्ड केला होता, त्याने या जोडप्याला ब्लॅकमेल करत 32,000 रुपये उकळले होते. त्यानंतर आता उत्तर प्रदेशातून आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे.
अशातच आता गाझियाबाद आणि मेरठ साऊथ दरम्यान धावणाऱ्या नमो भारत एक्सप्रेस ट्रेनमधील एक व्हिडिओ समोर आला आहे. यात एक तरूण मुलगा आणि मुलगी अश्लील वर्तन करताना दिसत आहे. हा व्हिडिओ रेल्वेच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. त्यानंतर हा व्हिडिओ लोको पायलटने सोशल मीडियावर प्रसारित केला होता. यानंतर रेल्वे मंत्रालयाने या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन लोको पायलटला तात्काळ निलंबित केले होते.
या घटनेचा तपास केल्यानंतर असे समोर आले आहे की, हा मुलगा आणि मुलगदी मुले आणि मुली दोघेही गाझियाबादमधील एका शाळेचे विद्यार्थी होते. ते गाझियाबादमधील दुहाई स्टेशनवरून ट्रेनमध्ये चढले. हे दोघे ट्रेनमध्ये शिरताच त्यांनी अश्लील हावभाव करण्यास सुरुवात केली. त्यांचे हे कृत्य मेरठ साउथ स्टेशनपर्यंत सुरू होती. या प्रवासादरम्यान, डब्यात फारशी गर्दी नव्हती. मात्र हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या व्हायरल व्हिडिओमध्ये हे दोघे शाळेच्या गणवेशात दिसत आहे.
हा व्हिडिओ समोर आल्यानंतर रेल्वे प्रशासनाने अशा घटना गांभीर्याने घेतल्या जात असल्याचे म्हटले आहे. रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी म्हटले की, असे वर्तन केवळ प्रवाशांच्या सुरक्षिततेलाच धोका नाही, तर रेल्वेची शिस्त आणि कायद्याचेही उल्लंघन आहे. आता व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर प्रशासनाने तात्काळ चौकशी सुरू केली. आता अधिकाऱ्यांनी आरोपींवर कठोर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. दरम्यान, अधिकाऱ्यांना असा व्हिडिओ व्हायरल न करण्याचे आवाहन केले आहे.