
कोणी कधी जास्त खर्च केला तर आपण म्हणतो पैशांचा पाऊस पडतोय का? तर याठिकाणी तर खरंच पैशांचा पाऊस झाला आहे. ते सुद्धा 500 रुपयांच्या नोटांचा पाऊस.. 500 च्या नोटांचा पाऊस सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. उत्तर प्रदेशातील प्रयागराज जिल्ह्यातील सोराव तहसीलमधील आझाद सभागरसमोर एक अशी घटना घडली, ज्यामुळे पाहणाऱ्यांना हसायला आणि विचार करायला भाग पाडलं. एका माकडाने दुचाकीच्या डिग्गीतून रोख रक्कम भरलेली बॅग चोरली आणि जवळच्या पिंपळाच्या झाडावर चढून त्यावर 500 रुपयांच्या नोटांचा वर्षाव केला.
झाडावरून पडत असलेले पैसे अनेकांनी गोळा देखील केले. पण सत्य परिस्थिती समोर आल्यानंतर सर्वांनी पैसे मालकाला परत केले. सोशल मीडियावर घटनेचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. संबंधित घटना सोमवारी दुपारी घडली आहे.
सोराव तहसीलच्या गंगानगर झोनमध्ये आपल्या जमिनीची नोंदणी करण्यासाठी आलेल्या एका तरुणाने आझाद सभागृहासमोर आपली बाईक पार्क केली. त्याने त्याच्या दुचाकीच्या डिग्गीमध्ये रोख रकमेची बॅग ठेवली होती, ज्यामध्ये लाखो रुपयांच्या नोटा होत्या. तरुण कार्यालयाच्या आजूबाजूच्या परिसरात होता. पण तरुणाचं दुर्लक्ष झालं, तेवढ्यात माकड आले आणि त्यांनी डिग्गीतून पैशांनी भरलेली बॅग काढली.
प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, माकडांनी नोटांनी भरलेली बॅग झाडावर नेली. लोकांनी ओरडण्यास सुरुवात केली. पण माकडांनी बॅग खाली फेकली नाही. अखेर बॅगेत काही खायला मिळालं नाही. तेव्हा माकडांनी बॅग खाली फेकली. जवळपास 10 – 15 मिनिटं सर्व काही असंच सुरु होतं.
खाली असलेल्या लोकांनी गोळा केलेल्या नोटा मोजल्या आणि त्या त्या तरुणाला परत केल्या. तेव्हा त्या तरुणाने सुटकेचा नि:श्वास सोडला, पण आपली ओळख सांगण्यास नकार दिला. तरुण म्हणाला, ‘माझ्या एका चुकीमुळे लाखोंचं नुकसान झालं असतं.’, एवढंच नाही तर. परिसरात माकडांपासून सावध राहा… असे बोर्ड देखील लावण्यात आले आहेत. सांगायचं झालं तर, सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. सर्वात महत्त्वाचं म्हणजे सोशल मीडियावर अनेक जण फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असतात.