
रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी हे आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. त्यांचे घर, अँटिलिया, जगातील सर्वात महागड्या आणि आलिशान घरांपैकी एक आहे. अंबानींचे सोहळे असो किंवा मग घरी पार्टी त्यांच्या कपड्यांपासून ते जेवणापर्यंत सर्वच खास असतं. पण फक्त हे खास क्षणांनाच नाही तर रोज त्यांच्या घरी खासच जेवण बनवलं जातं. अंबानी कुटुंबातील सर्वच व्यक्ती खवय्ये आहेत. ते खाण्याच्याबाबतीत अत्यंत जागृक असतात. तसेच ते शुद्ध शाकाहारी आहेत. पौष्टिक, गरम आणि स्वादिष्ट जेवण असावं यासाठी अंबानी फार तत्पर असतात.त्यामुळे त्यांच्या घरी नक्की काय जेवण असतं हे जाणून घेण्यास अनेकांना उत्सुकता असते.
अंबानी कुटुंबातील आवडते पदार्थ कोणते?
अंबानी कुटुंब साधे अन्न खाण्यावर विश्वास ठेवते. मुकेश आणि नीता अंबानीसह संपूर्ण कुटुंब कडक शाकाहारी आहे आणि साधे पण पौष्टिक जेवण खातात.मुकेश अंबानी नाश्त्यात पपईचा रस पितात आणि इडली सांबार खातात. नीता अंबानींना ज्यूस आणि फळे, काजू आणि सुकामेवा आवडते. दुपारच्या जेवणात, अंबानी कुटुंब घरी शिजवलेली डाळ, भात, भाज्या, रोटी, सूप आणि सॅलड खातात. त्यांची डाळ गुजराती पद्धतीने बनवली जाते. अंबानी कुटुंब रात्रीच्या जेवणात हलके जेवण खातात, ज्यामध्ये नाचणी किंवा बाजरीची भाकरी, गुजराती शैलीतील भाजीपाला आणि सॅलडचा समावेश असतो
रोज बनवल्या जातात एवढ्या रोट्या
तसेच नीता अंबानी या फिटनेसकडे किती लक्ष देतात हे सर्वांना माहित आहे. त्यासाठी फिटनेस राखण्यासाठी, अंबानी कुटुंब जंक फूड खाणे टाळते. मुकेश अंबानींना शेवपुरी आवडते, म्हणून ते आठवड्यातून एकदा ते खातात. एवढंच नाही तर अजून एक थक्क करणारी गोष्ट म्हणजे अंबानी यांच्या घरी रोज तब्बल 4000 रोट्या बनवल्या जातात. पण इतक्या रोट्या कोण खातं? अंबानी कुटुंब इतके जेवतात का? असा प्रश्न नक्कीच पडतो. पण या रोट्या अंबानी हाऊसमध्ये काम करणाऱ्या सुमारे 600 कर्मचाऱ्यांसाठी दररोज तयार केल्या जातात. यामध्ये सफाई कर्मचारी, सुरक्षा रक्षक, ड्रायव्हर, स्वयंपाकी, तंत्रज्ञ आणि वैयक्तिक सहाय्यक यांचा समावेश आहे. या सर्वांना पौष्टिक, गरम आणि स्वादिष्ट जेवण दिले जाते. त्यांच्यासाठीही रोट्या बनवल्या जातात.
चपाती बनवण्यासाठी मशीन बसवण्यात आली
भारतीय रेल्वेचे निवृत्त अधिकारी दिवाकर यांनी ज्ञान-सामायिकरण प्लॅटफॉर्म Quora वर ही माहिती शेअर केली. त्यांच्या मते, अंबानी यांच्या घरी रोट्या बनवण्यासाठी एक खास रोटी मेकर मशीन बसवण्यात आली आहे, जी काही मिनिटांत शेकडो रोट्या बनवू शकते. परंतु या मशीनवर अवलंबून राहणे एकमेव नाही. रोट्यांचा दर्जा आणि चव राखण्यासाठी, एका कुशल शेफला नियुक्त करण्यात आलं आहे, ज्याचा पगार तब्बल लाखोंमध्ये आहे.
ब्रेड मेकरचा पगार दरमहा 2 लाख रुपये आहे
अंबानी कुटुंब चपाती बनवणाऱ्याला दरमहा दोन लाख रुपये पगार देतात. हे केवळ त्या शेफच्या कठोर परिश्रमामुळेच नाही तर त्याने प्रत्येक रोटीचा आकार, जाडी आणि चव एकसारखी असावी याकडे तो लक्ष देतो म्हणून.