रस्तावर कचरा फेकताय? तर सावधान! मुंबई पालिकेच्या AI कॅमेऱ्यांची आता तुमच्यावर असणार नजर, BMC ने AI ची दाखवली झलक, आता रस्त्यावर कचरा फेकाल तर..

मुंबई महानगरपालिकेने मुंबईला स्वच्छ ठेवण्यासाठी आता AI चा वापर केला आहे. रस्त्यावर कचरा फेकणाऱ्यांवर आता AI कॅमेऱ्यांची नजर असणार,त्यामुळे आता मुंबईकरांनो जरा जपून तु्म्ही कचरा फेकताना तु्म्ही कॅमेऱ्यात कैद होणार आहात, वाचा सविस्तर

रस्तावर कचरा फेकताय? तर सावधान! मुंबई पालिकेच्या  AI  कॅमेऱ्यांची आता तुमच्यावर असणार नजर, BMC ने AI ची दाखवली झलक, आता रस्त्यावर कचरा फेकाल तर..
MUMBAI BMC AI CAMERA
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 30, 2026 | 4:51 PM

रस्त्यावर कचरा फेकण्याची सवय पडणार महागात, मुंबई महानगर पालिकेच्या AI कॅमेऱ्यांची तुमच्यावर असणार नजर, त्यामुळे रस्त्याच्या कडेला किंवा कुठेही कचरा फेकलात तर तुम्ही सहजपणे त्या कॅमेऱ्यात कैद होणार आहात. याशिवाय तो कॅमेरा मोठा आवाज करणार आणि तुम्हाला परिसर स्वच्छ ठेवण्याचा सल्लाही देणार आहे. त्या आवाजामु़ळे तुम्ही रस्त्यात कचरा फेकताय हे जगजाहीर होणार. त्यामुळे जरा जपून. मुंबई महापालिकेने शहरातील अस्वच्छतेला आळा घालण्यासाठी ही AI ची मदत घेतली आहे.

मुंबईतील माहिम परिसरात या उपक्रमाची सुरूवात करण्यात आली आहे. डॉ. रायकर मार्गावरील गजानन वाटिका येथे पहिला AI कॅमेरा बसवण्यात आला आहे. या ठिकाणी वारंवार कचरा टाकला जात असल्याने हा परिसर कचरा साचण्याच्या संवेदनशील ठिकाणांमध्ये याचा समावेश केला आहे. त्यामुळे त्या ठिकाणी लक्ष ठेवण्यासाठी हा AI कॅमेरा बसवण्यात आला आहे.

Loading...

आता या AI कॅमेऱ्याचं नेमकं काम काय?

तर कोणीही व्यक्ती कचरा टाकण्यासाठी त्या ठिकाणी आल्यास कॅमेरा त्याच्या हातातील वस्तू टिपणार. जर कचरा असल्याचे कळल्यास तिथला कॅमेरा परिसरात कचरा टाकू नका, स्वच्छता राखा, असा मोठा आवाज करेल.

मुंबई महानगरपालिकेने हा व्हिडिओ एक्सवर शेअर केला आहे. महापालिकेने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती हिरव्या पिशवीतून कचरा आणून रस्त्याच्या कडेला ठेवताना दिसते. त्याचे वेळी कॅमेऱ्याची नजर त्या व्यक्तीवर पडते आणि स्पीकर वरून इशारा देते. या व्हिडिओमुळे तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आता कचरा टाकणाऱ्यांवर बारीक लक्ष ठेवलं जाणार आहे

सध्या हा प्रायोगिक उपक्रम माहिममध्ये सुरू करण्यात आला आहे. मात्र मुंबईतील इतर भागांमध्येही असे कॅमेरे बसवण्याची महापालिकेची योजना आहे. शहरातील कचरा साचण्याची 283 संवेदनशील ठिकाणं लक्षात घेऊन हा उपक्रम पु़ढे नेण्याचा महापालिकेचा विचार आहे.

सोशल मीडियावर मुंबईकरांच्या प्रतिक्रिया रंगल्या

महानगरपालिकेच्या हा प्रयोगाचं अनेकांनी स्वागत केलं आहे. काहींनी केवळ इशारा देऊन उपयोग नाही, तर वारंवार कचरा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईही झाली पाहिजे,अशी मागणी केली आहे. थोडक्यात काय तर मुंबई स्वच्छ ठेवण्यासाठी आता महापालिकेने तंत्रज्ञानाची मदत घेतली आहे. पण कॅमेरे कितीही लावा, शहर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी शेवटी नागरिकांचीही आहे. त्यामुळे रस्त्यावर कचरा टाकण्याऐवजी योग्य ठिकाणी कचरा टाकण्याची सवल लावली मुंबई कायम स्वच्छ राहिल.

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us