मोदीजींचं Digital India चं स्वप्न, देशातल्या शेवटच्या चहाच्या दुकानावर UPI Payment

आनंद महिंद्रा यांनी आपल्या ट्वीटमध्ये या दुकानाचे फोटो शेअर करत लिहिले की, हा एक फोटो हजार शब्दांच्या बरोबरीचा आहे.

मोदीजींचं Digital India चं स्वप्न, देशातल्या शेवटच्या चहाच्या दुकानावर UPI Payment
Indias last shop UPI payment
Image Credit source: Social Media
| Updated on: Nov 06, 2022 | 2:12 PM

देशातील शेवटचे चहाचे दुकान काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. यानंतर इथली आसपासची अनेक दुकाने याच नावाने व्हायरल झाली. सीमाभागातील अशी सर्व दुकानं सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत असल्याचे अनेकवेळा दिसून आलंय. दरम्यान, याच्याशी संबंधित एक खास फोटो समोर आला आहे.

वास्तविक, देशातील शेवटचे चहाचे दुकान नावाचे हे दुकान मणिफद्रपुरी माणा नावाच्या गावाजवळ बद्रीनाथ येथे आहे. या दुकानात सर्वात खास गोष्ट पाहायला मिळतीये.

ही खास गोष्ट आहे यूपीआय बारकोड! दुकानाच्या हा यूपीआय बारकोड काऊंटरवर ठेवण्यात आलाय. म्हणजेच दहा हजार फूट उंचीवरही तुम्ही डिजिटल पेमेंट करू शकता. डिजिटल इंडियाचे हे उत्तम उदाहरण आहे.

दहा हजार फूट उंचीवरचे फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये बोर्डवर ‘इंडियाज लास्ट टी शॉप’ आणि यूपीआय बारकोड आणि दुकान मालक दिसतंय.

चित्रांमध्ये चहाच्या दुकानाच्या पाटीवरही ‘मणिफद्रपुरी माणा, व्यास गुफा श्री बद्रीनाथ’ असे लिहिलेले आहे. यानंतर हा फोटो बिझनेसमन आनंद महिंद्रा यांनीही शेअर केला आहे.

आनंद महिंद्रा यांनी आपल्या ट्वीटमध्ये या दुकानाचे फोटो शेअर करत लिहिले की, हा एक फोटो हजार शब्दांच्या बरोबरीचा आहे.

हे चित्र भारताच्या डिजिटल पेमेंट इकोसिस्टमची व्याप्ती दर्शवते. जय हो! महिंद्राच्या चेअरमनचे हे ट्विट अधिकाधिक व्हायरल होत असून ट्विटर युजर्स त्यावर सतत आपल्या प्रतिक्रिया देत आहेत.