Narendra Modi : मोदी म्हणतात मी अशिक्षित, व्हाईस चान्सलर म्हणतात ते एम ए पास, जयंती पटेल म्हणतात वर्गात बसूच दिलं नाही! खरं काय?

Narendra Modi: " मी काय शिकलेलो नाहीये मित्रांनो! मी 17 वर्षापर्यंत गावात राहून शाळेतलं शिक्षण घेतलं. जसं मॅडम म्हणल्या ना की आपल्या शिक्षणामुळे माणूस पुढे जाऊ शकत नाही तर मी शिक्षणच घेतलं नाही. म्हणून पुढे आलो!"

Narendra Modi : मोदी म्हणतात मी अशिक्षित, व्हाईस चान्सलर म्हणतात ते एम ए पास, जयंती पटेल म्हणतात वर्गात बसूच दिलं नाही! खरं काय?
Narednra Modi
Image Credit source: Social Media
| Updated on: Jul 07, 2022 | 3:14 PM

मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंह (Congress Digvijay Singh) यांनी नरेंद्र मोदींचा एक व्हिडीओ ट्विट केलाय. हा व्हिडीओ सध्या प्रचंड गाजतोय. त्याला कारणंही तसंच आहे. पंतप्रधान या व्हिडीओमध्ये स्पष्टपणे सांगताना दिसून येतायत की मी शिकलो नाही म्हणून माझी प्रगती झाली, म्हणून मी पुढे आलो! दिग्विजय सिंह यांनी दोन ट्विट केलेत आणि लोकांना प्रश्न विचारलाय की सत्य नेमकं काय आहे? पहिल्या ट्विटमध्ये त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा (PM Narendra Modi) एक व्हिडीओ ट्विट (Tweet Viral) केलाय ज्यात नरेंद्र मोदी म्हणतायत,” मी काय शिकलेलो नाहीये मित्रांनो! मी 17 वर्षापर्यंत गावात राहून शाळेतलं शिक्षण घेतलं. जसं मॅडम म्हणल्या ना की आपल्या शिक्षणामुळे माणूस पुढे जाऊ शकत नाही तर मी शिक्षणच घेतलं नाही. म्हणून पुढे आलो!”

“…म्हणून पुढे आलो!”

 …त्यांना मी बाहेर राहण्याचा सल्ला दिला- जयंती पटेल

हे ट्विट केल्यानंतर दिग्विजय सिंह यांनी लगेचच दुसरी एक पोस्ट शेअर केलीये जी जयंती पटेल नावाच्या एका इसमाची फेसबुक पोस्ट आहे. या पोस्टमध्ये जयंती पटेल म्हणतायत की त्यांनी इंडियन एक्स्प्रेसमध्ये गुजरात युनिव्हर्सिटीच्या व्हाईस चान्सलरचं स्टेटमेंट वाचलं ज्यात व्हाईस चान्सलरने नरेंद्र मोदी एम.ए.चा भाग-2 उत्तीर्ण झाले आहेत असं म्हटलं होतं. व्हाईस चान्सलरने स्टेटमेंट देताना काही पेपर्स आणि त्यात मिळालेले मार्क्ससुद्धा दिले होते. परंतु जयंती पटेल यांचं असं म्हणणं आहे की ते स्वतः 1969-1993 दरम्यान गुजरात युनिव्हर्सिटीमध्ये राज्यशास्त्र विभागात शिकवायला होते. व्हाईस चान्सलर ज्या पेपर्सची नावं इथे घेतायत असे विषय त्यावेळी अंतर्गत आणि बाह्य विद्यार्थ्यांना देण्यात आले नव्हते.”मला या विषयांमध्ये गडबड वाटते” असंही जयंती पटेल म्हणतात. याशिवाय नरेंद्र मोदी यांनी राज्यशास्त्रात एम.ए. भाग-1 मध्ये नियमित विद्यार्थी म्हणून प्रवेश घेतला होता तेव्हा त्यांची उपस्थिती माझ्या वर्गात त्यांची मुदत पूर्ण करण्यासाठी पुरेशी नव्हती आणि मी ते कधीच माफ केले नाही. इतरांनी ते मंजूर केले असेल पण त्यांना मी बाहेर राहण्याचा सल्ला दिला होता असंही जयंती पटेल म्हणतात.

जयंती पटेल काय म्हणतात, सविस्तर!

नरेंद्र मोदी M.A. विषय

गुजरात युनिव्हर्सिटीचे व्हाईस चान्सलरचे निवेदन इंडियन एक्स्प्रेसमध्ये प्रकाशित झाले आहे की नरेंद्र मोदी यांनी एम.ए.चा भाग-२ उत्तीर्ण केला आहे. त्यांनी काही पेपर्स आणि गुणांची नावे खालीलप्रमाणे दिली आहेत. “एमए द्वितीय वर्षातील गुणांचे विभाजन दर्शविते की मोदींना राज्यशास्त्रात 64 गुण, युरोपियन आणि सामाजिक राजकीय विचारांमध्ये 62 गुण, आधुनिक भारत/राजकीय विश्लेषणात 69 गुण आणि राजकीय मानसशास्त्रात 67 गुण मिळाले,” ते म्हणाले. तथापि, पेपर्सच्या नावांमध्ये काहीतरी गडबड आहे असे दिसते, माझ्या माहितीनुसार असे कोणतेही पेपर्स भाग-2 मध्ये अंतर्गत किंवा बाह्य विद्यार्थ्यांना देण्यात आले नव्हते. मी राज्यशास्त्र विभागाच्या विद्याशाखेत होतो आणि जून १९६९-१९९३ दरम्यान तिथे शिकवायचो. नरेंद्र मोदी यांनी राज्यशास्त्रात एम.ए. भाग-1 मध्ये नियमित विद्यार्थी म्हणून प्रवेश घेतला, तथापि त्यांची उपस्थिती माझ्या वर्गात त्यांची मुदत पूर्ण करण्यासाठी पुरेशी नव्हती आणि मी ते कधीच माफ केले नाही, अर्थातच इतरांनी ते मंजूर केले असेल पण त्यांना यापुढे बाहेरून हजर राहण्याचा सल्ला देण्यात आला.

नेमकं सत्य काय?

मग आता ह्यात नेमकं सत्य काय? असा प्रश्न मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री काँग्रेस नेते दिग्विजय सिंह विचारतायत. नरेंद्र मोदी शिकलेले नाहीत की शिकलेले आहेत? जर शिकलेले आहेत तर त्यांनी एमए पूर्ण केलंय? एमए पूर्ण केलंय तर जयंती पटेल जे त्याच काळात गुजरात युनिव्हर्सिटीमध्ये प्राध्यापक होते ते बोलतायत त्यात कितपत तथ्य आहे? गुजरातच्याच्या व्हाईस चान्सलरचं असं स्टेटमेंट का? असे अनेक प्रश्न नागरिकांना या ट्विटकडे पाहून पडत आहेत.