VIDEO : मास्क न लावल्याने तरुणाला खतरनाक शिक्षा, व्हिडीओ पाहून तुम्ही मास्क घालायचं विसरणारच नाही…!

कोरोनाव्हायरस संसर्ग टाळण्यासाठी, सर्व शास्त्रज्ञ आणि डॉक्टर मास्क घालण्याचा सल्ला देतात. जगातील जवळपास सर्व देशांनी मास्क घालण्यासाठी कठोर नियम बनवले आहेत.

VIDEO : मास्क न लावल्याने तरुणाला खतरनाक शिक्षा, व्हिडीओ पाहून तुम्ही मास्क घालायचं विसरणारच नाही...!
मास्क न घातल्यामुळे मशिन तरूणाला शिक्षा देते
| Edited By: | Updated on: Jun 24, 2021 | 12:45 PM

मुंबई : कोरोनाव्हायरसच्या संसर्ग टाळण्यासाठी, सर्व शास्त्रज्ञ आणि डॉक्टर मास्क घालण्याचा सल्ला देतात. जगातील जवळपास सर्व देशांनी मास्क घालण्यासाठी कठोर नियम बनवले आहेत. जेणे करून लोक घराबाहेर पडताना मास्क घालतील. मात्र, काही लोक तरीही मास्क घालणे टाळतात. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढण्याची शक्यता आहे. (Not wearing mask youth Geeting punishment Video goes Viral on Social Media)

जे लोक मास्क घालत नाहीत, त्यांच्यामुळे इतरांच्याही आरोग्याला धोका निर्माण होतो. सोशल मीडियावर सध्या एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये मास्क न घातलेल्या व्यक्तीला अनोखी शिक्षा मिळताना दिसत आहे. विशेष म्हणजे मास्क न घातलेल्या व्यक्तीला मशीनच शिक्षा देते आहे. या व्हिडीओमध्ये दिसते आहे की, मास्क घातलेल्या व्यक्तीला प्रवेश दिला जात आहे, आणि ज्या व्यक्तींने मास्क घातलेले नाही.

त्याला मशिन हातोडीने पायावर मारते आहे. विशेष म्हणजे जोपर्यंत तो व्यक्ती मास्क घालत नाही. तोपर्यंत मशिन त्याला आतमध्ये प्रवेश देखील देत नाही. हा व्हिडिओ आयपीएस अधिकारी रूपिन शर्मा यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केला आहे. मात्र, हा व्हिडिओ नेमका कुढला आहे हे माहिती नाही.

लोक हा व्हिडिओ केवळ सोशल मीडियावर शेअर करत नाहीत तर त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देखील देत आहेत. हा व्हिडिओ लोकांना खूप जास्त आवडला आहे. तर काही लोक या व्हिडीओवर कमेंट करत म्हणत आहेत की, या मशिनची भारतात सर्वात जास्त गरज आहे. हा व्हिडीओ अत्यंत कमी वेळात सोशल मीडियावर तूफान व्हायरल झाला आहे.

संबंधित बातम्या : 

Video | नदीत पोहण्यासाठी पाण्यात उतरली अन् मध्येच मोठ्याने ओरडली, नेमके कारण काय ?

Video | तरुण गाडी घेऊन महिलेजवळ गेला, भर रस्त्यात केलं भलतंच काम, व्हिडीओ व्हायरल

Video | घरी जाण्याची तरुणाला भलतीच घाई, समोरुन कार आली अन् भर पावसात अपघात, व्हिडीओ व्हायरल

(Not wearing mask youth Geeting punishment Video goes Viral on Social Media)