जुन्या काळातली दूरध्वनीची जाहिरात होतेय व्हायरल! गजब ट्रिक होती, नक्की बघा

ही जाहिरात जरी 1993 ची असली तरी पुन्हा एकदा चर्चेत आहे. हा व्हिडिओ नुकताच एका ट्विटर हँडलवरून पोस्ट करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये जुन्या काळातील दूरध्वनी संभाषणांचे चित्रण करण्यात आले आहे. आधी दूरध्वनीवर बोलताना किती धडपड करावी लागत होती

जुन्या काळातली दूरध्वनीची जाहिरात होतेय व्हायरल! गजब ट्रिक होती, नक्की बघा
telephone ad goes viral
Image Credit source: Social Media
| Updated on: Mar 26, 2023 | 3:49 PM

टेक्नॉलॉजीमुळे लोकांचे जग खूप सोपे झाले आहे. मोबाईल फोनपासून टीव्ही आणि इंटरनेटपर्यंत सर्व गोष्टी खूप सोप्या झाल्या आहेत. या सगळ्यात स्मार्टफोनने एक क्रांती घडवून आणली आहे. पण जुन्या काळात या फोनचा वापर कसा केला जात होता याची एक जाहिरात नुकतीच व्हायरल झाली आहे. ही जाहिरात जरी 1993 ची असली तरी पुन्हा एकदा चर्चेत आहे. हा व्हिडिओ नुकताच एका ट्विटर हँडलवरून पोस्ट करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये जुन्या काळातील दूरध्वनी संभाषणांचे चित्रण करण्यात आले आहे. आधी दूरध्वनीवर बोलताना किती धडपड करावी लागत होती आणि वायर लावल्यामुळे त्याला पकडणे अवघड होते, त्यानंतर एक युक्ती वापरण्यात आली, हे या व्हिडिओत दाखवण्यात आले आहे.

व्हिडिओमध्ये हेडसेट दिसत आहे की, फोन कानाला चिकटवण्यासाठी हेडसेटचा वापर करण्यात आला आहे. तो आपल्या डोक्यावर व्यवस्थित बसेल आणि त्याला हात लावावा लागणार नाही अशा पद्धतीने तो टेलिफोनला चिकटवला होता. त्यामुळे हे संभाषण खूप सोपे झाले आणि तुम्ही तुमचे काम करत असतानाही लोकांशी बोलू शकता. फोनच्या मागील बाजूने हेडसेट लावण्यात आलेला दिसतोय.

या युक्तीला पुढे हँड फ्री मोबाइल असे संबोधले जाऊ लागले. नव्या जमान्यातील मोबाइल फोन आल्यानंतर हे सगळं मागे पडलं असलं तरी या जुन्या जाहिराती पाहिल्यावर लक्षात येतं की त्या काळी कोणत्या प्रकारचा जुगाड वापरला जात होता, जेणेकरून लोकांशी संवाद साधणं सोपं होईल. हा व्हिडिओ व्हायरल होताच लोकांनी त्यावर प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आणि त्यांनी जुने दिवस आठवायला सुरुवात केली.