
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या काही फोटोंमध्ये नुसता गोंधळ असतो. ही कोडी सोडवायला प्रचंड अवघड असतात. ऑप्टिकल इल्युजन असाच प्रकार असतो तो डोक्याचं दही करतो. पण कदाचित तुम्हाला हे माहीत नसेल की, ही चित्रे केवळ तुमचं निरीक्षण कौशल्य सुधारत नाहीत, तर याने तुमच्या मेंदूचाही व्यायाम होतो. या चित्रांमध्ये काहीतरी दडलेलं आहे, ते शोधण्याचं काम दिलं जातं. सध्या असंच एक ऑप्टिकल इल्युजन सोशल मीडियावर खूप चर्चेत आहे, ज्यात तुम्हाला साप शोधावा लागणारे.
आज आम्ही तुमच्यासाठी आणलेल्या ऑप्टिकल इल्यूजन टेस्टमध्ये एक माणूस घराबाहेरच्या खुर्चीवर विसावला आहे. पण मृत्यू आपली वाट पाहत आहे, याची त्याला कल्पनाही नाही.
चित्रात कुठेतरी विषारी साप लपलेला असतो, जो त्याला कुठल्याही क्षणी चावू शकतो. आता तुम्हीच या व्यक्तीचा जीव वाचवू शकता.
तो साप कुठे आहे हे तुम्ही ७ सेकंदात सांगू शकाल का? आम्हाला माहित आहे की तुम्ही ऑप्टिकल भ्रम सोडविण्यासाठी उत्सुक आहात.
वरील चित्रात आपण पाहू शकता, संध्याकाळी ही व्यक्ती घराबाहेर आरामात खुर्चीवर बसून दृश्याचा आनंद घेत असते. जवळच एक विंचू आहे, पण तो माणूस आधीच त्यावर नजर ठेवून आहे.
पण इथे एक साप सुद्धा आहे. याबाबत त्या माणसाला माहीतच नाही. कलाकाराने साप अशा ठिकाणी लपवून ठेवला आहे जो लोकांना सहजासहजी दिसत नाही.
आम्हाला वाटते की आपल्याला ठरलेल्या वेळेत साप सापडला असेल. ज्यांना साप सापडला नाही, त्यांच्यासाठीही आम्ही खाली दिलेल्या उत्तरासह फोटो शेअर करत आहोत.
Here is the snake