Whatsapp वर चॅट करणारा पोपट!

हा पोपट व्हॉट्सॲप चॅटमध्ये मेसेज टाइप करताना दिसत आहे.

Whatsapp वर चॅट करणारा पोपट!
parrot chatting on whatsapp
Image Credit source: Social Media
| Updated on: Nov 04, 2022 | 9:03 AM

सोशल मीडियावर प्राणी-पक्ष्यांचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. अनेक व्हिडिओ बघताना असं वाटतं की, आजच्या युगात तेही इतके हुशार झाले आहेत. एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये एक पोपट दिसतोय. गंमत म्हणजे हा पोपट व्हॉट्सॲप चॅटमध्ये मेसेज टाइप करताना दिसत आहे.

खरंतर हा व्हिडिओ @Gulzar_sahabच्या “ज़िन्दगी गुलज़ार है!” ट्विटर हॅण्डलवर पोस्ट करण्यात आला आहे. यामध्ये पोपटाचे वर्णन अतिशय प्रतिभावान असे करण्यात आले आहे.

यानंतर हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. मोबाइलच्या स्क्रीनसमोरच पोपट बसलेला आहे, असे यात दिसते. विशेष म्हणजे या पोपटाचा रंगही अगदी वेगळा आहे.

हा मोबाइल एका व्यक्तीच्या हातात असून व्हॉट्सॲपचा चॅटबॉक्स उघडा आहे. त्या चॅटबॉक्समध्ये तो माणूस टाईप करत असताना पोपटाने चार्ज घेतला आणि आपल्या चोचीने टायपिंग करायला सुरुवात केली.

हे पाहून त्याने त्या पोपटाकडून मोठमोठे शब्द टाइप करायला सुरुवात केली आणि चॅटबॉक्स भरायला सुरुवात केली.

स्क्रीनच्या खालच्या बाजूला बनवलेली अक्षरे पोपट चोचीने दाबायला सुरुवात करतो आणि तो ते पाठवेपर्यंत दाबत राहतो, हे व्हिडिओत स्पष्टपणे दिसत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.