भारतातील हे सुंदर हिल स्टेशन फोटोग्राफीसाठी परफेक्ट, कितीही पाहिलं तरी मन भरत नाही

भारतातील फोटोग्राफर्ससाठी हे ठिकाण म्हणजे स्वर्गापेक्षा सुंदर, हिरवागार डोंगर आणि दऱ्या आणि स्वच्छ नदी, देशभरातून अनेक लोक या ठिकाणी फोटोशूटसाठी येतात.

| Updated on: Mar 14, 2026 | 5:52 PM
1 / 5
भारतातील अनेकांना डोंगराळ भागात फिरायला जाणे हे अनेकांना आवडत असते. हिल स्टेशनवर फिरायला गेल्यावर स्वच्छ हवा, हिरवागार निसर्ग आणि मनमोहक दृश्यांचा आनंद घेता येतो. अशाच निसर्गरम्य ठिकाणांपैकी एक म्हणजे अरुणाचल प्रदेशातील पासीघाट हे सुंदर हिल स्टेशन.

2 / 5

पासीघाट हे ठिकाण अजूनही मोठ्या प्रमाणात पर्यटनाच्या गर्दीपासून दूर आहे. त्यामुळे येथे येणाऱ्या पर्यटकांना शांत आणि स्वच्छ वातावरणात निसर्गाचा मनमुराद आनंद घेता येतो. या ठिकाणाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे येथे दिसणाऱ्या हिरव्यागार दऱ्या, सुंदर डोंगररांगा आणि निसर्गरम्य वातावरण.

3 / 5

पासीघाट हे ठिकाण फोटोग्राफीची आवड असलेल्या लोकांसाठी स्वर्गासारखे मानले जाते. येथे निसर्गाचे विविध रंग, धुक्याने वेढलेले डोंगर आणि नदीकाठी दिसणारे सुंदर दृश्य कॅमेऱ्यात टिपण्यासाठी उत्तम संधी देतात.

4 / 5

येथून वाहणारी नदी या भागाच्या सौंदर्यात आणखी भर घालते. नदीकाठचे निसर्गदृश्य आणि शांत वातावरण पर्यटकांना विशेष आकर्षित करते.

5 / 5

पासीघाट हे ठिकाण समुद्रसपाटीपासून सुमारे सुमारे 509 फूट उंचीवर वसलेले आहे. त्यामुळे येथे वर्षभर हवामान तुलनेने आल्हाददायक राहते.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us