AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Viral Video: मोर छतावर आला अन् अचानकपणे फुलविला पिसारा, पाहा नयनरम्य व्हिडीओ

मोराच्या पिसाऱ्याचे सौंदर्य सर्वांना अनुभवता यावे म्हणून तसे काही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत राहतात. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Viral Video: मोर छतावर आला अन् अचानकपणे फुलविला पिसारा, पाहा नयनरम्य व्हिडीओ
PEACOCK VIRAL VIDEO
| Edited By: | Updated on: Jun 12, 2021 | 3:47 PM
Share

मुंबई : आपल्याच धुंदीत नाचत असलेला आणि पिसरा फुलवलेला मोर एकदा तरी दिसावा, अशी प्रत्येकाचीच इच्छा असते. योगायोगाने तसा नजारा आपल्याला दिसलाच तर तो क्षण आपल्यासाठी अविस्मरणीय असाच असतो. अनेकांनी पिसारा फुलवलेला मोर पाहिलेला नसतो. मोराचे सौंदर्य सर्वांना अनुभवता यावे म्हणून अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत राहतात. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये मोर मोठ्या दिमाखात आपला पिसारा फुलवत आहे. (Peacock spreading his wings in special way video goes viral on social media)

अन् शेवटी शेवटी मोराने अचानकपणे पिसारा फुलवला

सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये एक मोर अतिशय आकर्षक पद्धतीने आपला पिसारा फुलवतोय. हा व्हिडीओ लोकांना चांगलाच आवडला आहे. व्हिडीओमध्ये दिसतं त्याप्रमाणे मोर एका घराच्या छतावर आल्याचे दिसत आहे. हा मोर आपल्याच विचारात असून इकडे तिकडे पाहतोय. हा मोर बदलत्या हवामानाचा आनंद घेत आहे. आपली मान इकडून तिकडे हालवत तो सगळीकडे बघतो आहे. व्हिडीओच्या सुरुवातीला हा मोर आपला पिसारा फुलवणार नाही असे वाटते. याच कारणामुळे आपण कंटाळूनही जातो. मात्र, शेवटी शेवटी या मोराने अचानकपणे आपला पिसारा फुलवल्याचे आपल्याला व्हिडीओमध्ये दिसते. विशेष म्हणजे पिसारा फुलवताना हा मोर अतिशय गोड ओरडत आहे. यावेळी पिसारा फुलवल्यानंतर हा मोर कशालाही न घाबरता कॅमेऱ्याकडे येताना दिसतोय.

व्हिडीओ पाहून कमेंट्सचा पाऊस

हा व्हिडीओ सोशल मीडियावर अपलोड केल्यानंतर नेटकरी मजेदार कमेंट्स करत आहेत. एक नेटकऱ्याने हा व्हिडीओ या वर्षातील सर्वात छान व्हिडीओ असल्याचं म्हटलंय. तर दुसऱ्या नेटकऱ्याने हा व्हिडीओ अतिशय छान असून मी त्याच्या प्रेमात पडलो आहे, अशी प्रतिक्रिया दिली आहे.

पाहा व्हिडिओ :

आयपीएस अधिकाऱ्याकडून व्हिडीओ ट्विट

दरम्यान, हा व्हिडीओ नेमका कुठला आहे ? याबाबत निश्चित माहिती मिळू शकलेली नाही. मात्र, त्याला आयपीएस अधिकारी Rupin Sharma यांनी शेअर केले आहे. सोबतच त्यांनी Watch till the end असे कॅप्शन देऊन व्हिडीओ शेवटपर्यंत पाहण्याचा सल्ला दिला आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

इतर बातम्या :

अवघडंय राव! पाणीपुरीत वेडिंग रिंग टाकून प्रपोज; अनोख्या प्रेम कहाणीवर नेटकरीही फिदा!

VIDEO : कपड्यांचा दुकानदार इतका का नाचतोय? पण भारी नाचतोय, सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

VIDEO | मालक रुग्णवाहिकेत, इमानदार कुत्रा मागोमाग धावत थेट रुग्णालयात

(Peacock spreading his wings in special way video goes viral on social media)

CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.