अवघडंय राव! पाणीपुरीत वेडिंग रिंग टाकून प्रपोज; अनोख्या प्रेम कहाणीवर नेटकरीही फिदा!

प्रेमात पडल्यावर लोक केंव्हा काय करतील हे सांगता, त्यामध्येही एखाद्या व्यक्तीला प्रपोज करायचा म्हटंल्यावर वेगळाच उत्साह पाहायला मिळतो. तो प्रपोजचा दिवस विशेष बनवण्यासाठी काहीतरी भन्नाट करण्यासाठी प्रयत्न केला जातो.

अवघडंय राव! पाणीपुरीत वेडिंग रिंग टाकून प्रपोज; अनोख्या प्रेम कहाणीवर नेटकरीही फिदा!

मुंबई : प्रेमात पडल्यावर लोक केंव्हा काय करतील हे सांगता येत नाही. त्यामध्येही एखाद्या व्यक्तीला प्रपोज करायचा म्हटंल्यावर वेगळाच उत्साह पाहायला मिळतो. तो प्रपोजचा दिवस विशेष बनवण्यासाठी काहीतरी भन्नाट करण्यासाठी प्रयत्न केला जातो. असाच हा प्रपोजचा दिवस विशेष करण्यासाठी एका प्रियकराने अनोखी शक्कल लढवत आपल्या प्रेयसीला प्रपोज केला आहे. (A person put wedding ring in paani puri to propose his girlfriend goes viral on internet)

त्याच्या या प्रपोजची चर्चा आता सोशल मीडियावर देखील होत आहे. विशेष म्हणजे प्रपोज करण्याची त्याची स्टाईल सोशल मिडियावर अनेकांना आवडली देखील आहे. एका व्यक्तीने पाणीपुरीमध्ये वेडिंग रिंग ठेवत आपल्या प्रेयसीला प्रपोज करत प्रेम व्यक्त केले आहे. लोकांना ही कथा ऐकताच आनंद झाला. या कथेविषयी ऐकल्यानंतर सोशल मीडियावर एका यूजर्सने लिहिले की, ज्याप्रकारे या व्यक्तीने त्याच्या प्रेयसीला प्रपोज केला आहे, त्याची ही कल्पना आश्चर्यकारक आहे.

या अनोख्या प्रपोजचे फोटो सध्या सोशल मिडियावर चांगलेच धुमाकूळ घालत आहेत. त्या व्यक्तीची अनोखी स्टाईल सर्वांनाच आवडली आहे. हेच कारण आहे की, ही कथा ऐकून लोक मुलाचे कौतुक करत आहेत. अनेकांनी या अनोख्या प्रपोजचे फोटो सोशल मीडिया शेअर देखील केली आहेत. लोकांनी या फोटोंवर मजेदार कमेंट देखील केल्या आहेत. काही दिवसांपूर्वी एका व्यक्तीने प्राणीसंग्रहालयात आपल्या मैत्रिणीला प्रपोज केला होता. त्यानंतर त्याचेही फोटो आणि व्हिडीओ सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल झाले होते.

संबंधित बातम्या : 

Video | दहा फुटाचा साप चढला विजेच्या खांबावर, शॉक लागल्यामुळे घडला मोठा अपघात, व्हिडीओ व्हायरल

Video | चेहरा झाककेली महिला, एक हात मागे; समोरच्या हतबल तरुणाचं नेमकं काय होणार ?, पाहा संपूर्ण व्हिडीओ

Video | पाणी पिण्यासाठी जीव व्याकूळ, तहानलेल्या हत्तीचा संयम एकदा पहाच !

(A person put wedding ring in paani puri to propose his girlfriend goes viral on internet)